दीडशे वर्षांची परंपरा, 'चोर गणपती' आले दारा!

श्री. गणपती पंचायतन संस्थानच्या सांगलीतील प्रसिद्ध गणपती मंदिरात बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन झालंय. दीडशे वर्षापासूनची पंरपरा असलेल्या या गणपतीला ‘चोर गणपती’ असं म्हटलं जातं.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Sep 8, 2013, 02:03 PM IST

www.24taas.com , झी मीडिया, सांगली
श्री. गणपती पंचायतन संस्थानच्या सांगलीतील प्रसिद्ध गणपती मंदिरात बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन झालंय. दीडशे वर्षापासूनची पंरपरा असलेल्या या गणपतीला ‘चोर गणपती’ असं म्हटलं जातं.
सगळ्यांना लाडक्या बाप्पाच्या आगमनाचे वेध लागलेत. गणेश चतुर्थीला वाजतगाजत बाप्पाचं स्वागत करण्यासाठी सारे सज्ज झालेत. सांगलीत मात्र दोन दिवस आधीच गणरायाचं आगमन होतं. कोणालाही माहिती न पडता या गणेशाची स्थापना होते. याच प्रथेला ‘चोर गणपती’ असं म्हटलं जातं. गेल्या दीडशे वर्षांपासून ही परंपरा सुरु आहे.
श्री. गणपती पंचायतन संस्थानच्या सांगलीतील प्रसिद्ध गणपती मंदिरात या ‘चोर गणपती’ची स्थापना करण्यात येते. दीड दिवसाच्या या गणपतीची मूर्ती कागदी लगद्यापासून बनवलेली असते. त्यामुळं या मूर्तीचं विसर्जन करण्याऐवजी तिला सुखरुप ठिकाणी ठेवून जतन केलं जातं.
‘चोर गणपती’बरोबरच गणेश चतुर्थीला नियमित गणेशाची स्थापना करण्य़ात येते. या मंदिरात पाच दिवस गणेश आराधनेचा सोहळा रंगतो. राजे विजयसिंह पटवर्धन यांच्या श्री गणपती पंचायतन संस्थानच्या या सोहळ्यासाठी अनेक राज्यातील शेकडो भाविक येतात.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.