मोदींच्या नावाने मंदिर उभारले.. `नमो` `नमो`चा गजर सुरूच..

राजकारणी, क्रिकेटर्स आणि सिनेमातील कलाकार यांचे चाहते जगभरात दिसून येतील, पण जालंधरमध्ये एक असा व्यक्ती आहे जो भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींचा खूप मोठा चाहता आहे.

Updated: Apr 14, 2014, 12:40 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, जालंधर
राजकारणी, क्रिकेटर्स आणि सिनेमातील कलाकार यांचे चाहते जगभरात दिसून येतील, पण जालंधरमध्ये एक असा व्यक्ती आहे जो भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींचा खूप मोठा चाहता आहे. या चाहत्याने केवळ आपल्या घराजवळ नरेंद्र मोदींचं मंदिरच नाही बनवलं, तर तो रोज नरेंद्र मोदींची पूजा देखील करतो. पंजाबमधील अरुण खुराणा `काकी` गावात राहतो.
गेली सात वर्ष खुराणा हा नरेंद्र मोदींचा वाढदिवस साजरा करतोय. २०१२मध्ये नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाच्या दिवशी खुराणा यांनी मोदी जोपर्यंत पंतप्रधान होत नाही, तोपर्यंत खुराणा दाढी काढणार नाही, अशी शपथ त्यांनी घेतली आहे. खुराणा हे रोज सकाळी आणि संध्याकाळी मोदींची पूजा करतात.
अरुण खुराणा यांच्याबाबत गावातील सोक सांगतात की, "खुराणा यांची मोदी भक्ती ही तेव्हापासून आहे, जेव्हा जालंधरलाच नाही, तर पूर्ण पंजाबला देखील मोदींची जास्त माहिती नव्हती.
खुराणा सांगतात की, "२००७मध्ये जेव्हा मोदी गुजरातचे मुख्यमंत्री बनले, तेव्हाच त्यांनी जालंधरच्या रामामंडी चौकात एक बोर्ड लावून त्यावर `फ्यूचर पीएम ऑफ इंडिया` असं लिहलं होतं. तेव्हा लोकांनी मला वेडा म्हणून संबोधलं होतं. पण मोदी बद्दलचा त्यांचा विचार बदलला नाही. गेल्या वर्षी श्यामा प्रसाद मुखर्जींच्या पुण्यतिथीच्या दिवशी जेव्हा मोदी पंजाबमध्ये आले होते. तेव्हा खुराणा यांची मोदींसोबत भेट झाली होती. त्यावेळी खुराणा यांनी मोदींना स्वत:च्या रक्तानं लिहिलेलं सात पानांचं पत्र दिलं होतं. तेव्हा मोदींनी त्यांना रक्तानं पत्र लिहण्यास बंद करा असं सांगितलं होतं. तसंच त्यांची दाढी २०१४मध्ये कापली जाईल अशी ग्वाही देखील मोदींनी खुराणा यांना दिली.
ब्रेडचा व्यापार करणाऱ्या अरुण खुराणा यांनी गजल सम्राट पंकज उधास यांचं एकच गाणं तब्बल साठ हजार वेळा ऐकून `लिम्का बुक ऑफ रिकार्ड्स`मध्ये देखील आपल्या नावाची नोंद केली आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.