अहमद पटेल हे माझे चांगले मित्र होते: नरेंद्र मोदी

भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनी दिलेल्या दूरदर्शनच्या मुलाखातीचा वाद संपतच नाही.

Updated: May 2, 2014, 11:29 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल हे माझे चांगले मित्र आहेत, असा दावा भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी केला. त्यांनी दूरदर्शन वाहिनीला दिलेल्या मुलाखात तसे म्हटले. होते. त्याआधी त्यांनी प्रियांका गांधी यांना आपली मुलगी असं संबोधलं होत. त्यावरुन वादंग झाला होता. आता मोदीं यांच्या या मुलाखतीवने दुसऱ्याच वादात भर पडली आहे.
मोदी यांचा मुलाखतीचा हा भाग प्रसारीत न करण्यावरून वादाला तोंड फुटले आहे. आता या इंटरव्यूचा अजून एक भाग प्रसारित न करण्यावरून वादात भर पडली आहे. मोदींनी मुलाखातीमध्ये काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांना आपला काँग्रेसमधील एक चांगला मित्र असल्याचे सांगीतलं होत. अहमद पटेल हे गुजरात मधील असून ते काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधीचे राजकीय सल्लागार देखील आहेत. मीडिया मध्ये या मुलाखातीमधील या भागाच फुटेज दाखविण्यात येत आहे, ज्यात मोदींनी अहमद पटेलला आपला चांगला मित्र म्हणून सांगत आहेत. मात्र, हा भाग दूरदर्शनने प्रसारित केलेला नाही, हे विशेष.
मोदींनी सांगितलं होत की, `अहमद पटेल हे आपले चांगले मित्र होत. तसेच मी अहमद पटेलांच्या घरी जेवायला देखील जात असे. पण आता का माहीत नाही, ते माझा फोन उचलत नाही. माझे आणि पटेल यांचे व्यक्तिगत संबंध देखील होते आणि माझी ईच्छा होती की, ते संबंध असेच राहतील. पण आता पटेल माझ्याशी बोलत देखील नाही. तसेच ते माझा कॉल देखील उचलत नाही, अशीही कबुली मोदी यांनी दिली.
दुसरीकडे भाजपने या मुलाखतीमधील भाग प्रसारित का केला नाही, असा सवाल सरकारला विचारला आहे. भाजपचे नेते रवीशंकर प्रसाद यांनी मोदींचा मुलाखतीतील कुठला ही भाग न वगळता पुन्हा प्रसारित करण्याची मागणी केली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.