www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये राजनाथ सिंह यांना गृहमंत्री बनविल्यानंतर त्यांच्या जागी पक्षाचा अध्यक्ष कोण होणार याची चाचपणी भाजपने सुरू केली आहे. पक्षांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक व्यक्तींच्या नावाची चर्चा करण्यात येत आहे. त्यात मोदीचे जवळचे अमित शहा याचे ही नाव पुढे येत आहे. शहा यांनी उत्तर प्रदेशचे प्रभारी राहून ८० पैकी ७२ जागा जिंकण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती.
पक्षाध्यक्षाच्या रेसमध्ये पार्टीचे सरचिटणीस जे. पी. नड्डा यांच्या नावाचीही चर्चा आहे, ते या रेसमध्ये सर्वात पुढे सुरू आहे. या नावांमध्ये आणखी एक नाव जोडले गेले ते राजस्थान भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष ओम माथुर यांचे. माथुरही मोदींच्या जवळचे मानले जातात, लोकसभा निवडणुकीवेळी ते गुजरातचे प्रभारी होते.
जस जशी ही रेस रंगात येणार तशी, शक्यतांचा बाजार अधिक गरम होणार आहे. शहा यांच्या बाबतीत बोलायचे झाले तर पंतप्रधान गुजरातचे असल्याने पक्षाचे अध्यक्ष दुसऱ्या राज्याचे होऊ शकतात , असे पक्षातील काही नेत्यांचे म्हणणे आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.