39 पत्नी असलेल्या चानाची निवडणुकीत मागणी वाढली

लोकसभा निवडणुकीत त्याच्या घरावर आहे सगळ्या नेत्यांचं लक्ष... कारण त्याच्या घरात आहे आहेत 100 पेक्षा जास्त मतं... मिझोरम राज्यातला जियॉन्घाका चाना म्हणजे 39 पत्नी असलेला व्यक्ती. 127 मुलं असलेल्या चानाचं कुटुंब म्हणजे व्होटबँक झालंय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Apr 16, 2014, 03:54 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, आयजॉल/मिझोरम
लोकसभा निवडणुकीत त्याच्या घरावर आहे सगळ्या नेत्यांचं लक्ष... कारण त्याच्या घरात आहे आहेत 100 पेक्षा जास्त मतं... मिझोरम राज्यातला जियॉन्घाका चाना म्हणजे 39 पत्नी असलेला व्यक्ती. 127 मुलं असलेल्या चानाचं कुटुंब म्हणजे व्होटबँक झालंय.
मिझोरमच्या आयजॉलच्या बैक्तांग गावात त्याचं हे कुटुंब 100 खोल्या असलेल्या हवेलीत राहतात. ब्रिटिश वृत्तपत्र डेली मेलला चानानं सांगितलं, गेल्या काही दिवसांपासून त्याच्या घरी नेत्यांची येजा खूप वाढलीय. प्रत्येक निवडणुकीत आमची मागणी खूप वाढते.चूंकी परिसरात निवडणूक विजयासाठी मतांचं अंतर खूप कमी असतं, म्हणून 100 मतं त्यांच्यासाठी खूप उपयुक्त असतात.
चानाच्या बायकांमधली एक रिंकमिनी म्हणते, "आम्ही सगळे एकाच ठिकाणी मतदान करतो. आमच्या एकाच कुटुंबातून जवळपास 160 मतं पक्की आहेत."
सामान्य मतदारांप्रमाणेच चाना यांनाही स्वच्छ, चांगलं आणि विकास करणारं सरकार हवंय. ते म्हणतात, आम्हाला फक्त चांगलं सरकार हवंय जे स्वत:च्या स्वार्थाशिवाय प्रदेशासाठी काम करेल. लोकसभा निवडणुकीतल्या चौथ्या चरणात मिझोरममध्ये मतदान झालं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.