www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
गरळ ओकणाऱ्या नेत्यांवर निवडणूक आयोगानं अखेर कारवाईचा बडगा उगारलाय. भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी निवडणूक आयोगानं भाजपचे उत्तर प्रदेशचे प्रभारी अमित शहा आणि सपाचे नेते आझम खान यांच्या सभांवर बंदी घातलीय. तसंच या दोघांच्या रोड शो आणि रॅलींवरही बंदी घालण्यात आलीय.
शहा आणि खान यांच्या गुन्हा दाखल करण्याचे आदेशही निवजणूक आयोगानं दिले आहेत. शहा यांनी मुझफ्फरनगर दंगलीचा बदला घेण्याचे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. तर आझम खान यांनीही हिंदू-मुस्लीमांमध्ये तेढ निर्माण करणारं वक्तव्य केलं होतं. त्यामुळं या दोघांवर कारवाई करण्यात आली आहे.
या निवडणुकीत निवडणूक आयोगानं गंभीर दखल घेऊन नेत्यांवर केलेली ही पहिलीच कारवाई आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.