www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
मुख्य निवडणूक आयुक्त यांनी निवडणूक आयोगावर झालेल्या टीकेवर मोजक्या शब्दात उत्तर दिलं आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त व्ही एस संपत आरोपांना उत्तर देतांना म्हणाले, एका राजकीय पक्षाने निवडणूक आयोगावर टीका केली आहे.
निवडणूक आयोग कोणत्याही राजकारण्याला आणि पक्षाला घाबरत नाही, संविधानाने निवडणूक आयोगाला भरपूर अधिकार दिले आहेत, असंही संपत यांनी यावेळी सांगितलं.
निवडणूक आयोगाने 2014 ची निवडणूक निष्पक्षपणे करण्यासाठी खूपकाही प्रयत्न केले आहेत. मीडियाही लोकसभा निवडणुकीचं निष्पक्षपणे वार्तांकन करत असतांना दिसून येत आहे.
गंगा नदीच्या आरतीची परवानगी निवडणूक आयोगाच्या हातात होती. ही परवानगी निवडणूक आयोगाने दिली आहे.
सभेची परवानगी प्रशासनाच्या हाती असते, सभेला परवानगी द्यायची किंवा नाही ते प्रशासनाचे अधिकार असल्याचंही व्ही एस संपत यांनी स्पष्ट केलं आहे.
नरेंद्र मोदी यांच्या वाराणसीतल्या एका सभेला परवानी नाकारण्यात आली आहे.
तसेच गंगेच्या आरतीचीही परवानगी उशीरा मिळाल्याची भाजपची तक्रार आहे. यावरून नरेंद्र मोदी आणि त्यांचे निकटवर्तीय अमित शहा यांनी निवडणूक आयोगावर टीका केली होती.
निवडणूक आयोग निवडणूक प्रक्रियेत घोळ करत असल्याचा आरोपही आज नरेंद्र मोदी यांनी केला.
या आरोपांना मुख्य निवडणूक आयुक्त व्ही एस संपत यांनी सूचक शब्दात उत्तर दिलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.