www.24taas.com, वृत्तसंस्था, वाराणसी
भाजप नेते अमित शाह आणि अरुण जेटली यांच्या नेतृत्वात वाराणसीमध्ये सुरू असलेला भाजप कार्यकर्त्यांचा सत्याग्रह संपलाय. बनारस हिंदू यूनिव्हर्सिटीच्या बाहेर भाजपचे नेते आंदोलन करत होते. नरेंद्र मोदींच्या रॅलीसाठी निवडणूक आयोगानं नकार दिल्यानं भाजपचं हे आंदोलन सुरू होतं.
आता याबाबत आज संध्याकाळी साडे चार वाजता निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहे. तर नरेंद्र मोदीही थोड्याच वेळात वाराणसीला पोहोचतील. वाराणसीत मोदींच्या रॅलीला परवानगी न मिळाल्यानं भाजप नेते-कार्यकर्ते आक्रमक झाले होते. प्रचंड ऊन असतांनाही मोठ्या संख्येनं भाजपचे समर्थक वाराणसीत हजर आहेत.
वाराणसीसोबतच दिल्लीतही भापजच्या नेत्यांनी ‘न्याय आंदोलन’ केलं. वाराणसीत १० मेला राहुल गांधींच्या रोड शोला प्रशासनानं परवानगी दिली, मग मोदींना का नाही? असा सवाल भाजपनं विचारलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.