www.24taas.com, झी मीडिया, श्रीनगर
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी लोकसभा निवडणुकीच्या विविध एक्झिट पोलनं केलेली भविष्यवाणी ‘टाईमपास’ असल्याचं म्हटलंय.
ट्विटरवर एक्झिट पोलबद्दल मत मांडताना ओमर अब्दुल्ली यांनी, केवळ एकच एक्झिट पोल महत्त्वाचं आहे आणि ते म्हणजे येत्या शुक्रवारी येणारं... बाकी सगळं तर केवळ टाईमपास आहे, असं म्हटलंय.
विविध संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणात लोकसभेचा कौल एनडीएच्या बाजुनं दिलाय. याच एक्झिट पोलवर ओमर अब्दुल्ला यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय.
तसंच विविध संस्थांनी काढलेल्या निष्कर्षांमध्ये प्रत्येकाचा अंदाज वेगळा दिसतोय. ‘एका चॅनलनं राजस्थानमध्ये काँग्रेसला केवळ दोन जागा दिल्यात आणि दुसऱ्या चॅनलनं 14... हे दोन्ही चॅनल एकच निवडणूक कव्हर आहेत ना?’ असं म्हणत ओमर अब्दुल्ली यांनी एक्झिट पोलच्या निष्कर्षांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.
The only exit poll that matters is the one that is slated for Friday, the rest are all great time pass.
— Omar Abdullah (@abdullah_omar) May 12, 2014
So one channel gives Cong only 2 in Rajasthan & another gives them 14. Did these channels cover the same election?
— Omar Abdullah (@abdullah_omar) May 12, 2014
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.