लक्ष्मण जगतापांनी घेतली राज ठाकरेंची भेट

लक्ष्मण जगताप आपल्या आमदारकीचा राजीनामा देणारेय. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचं आव्हान स्वीकारुन ते राजीनामा देणारेत. आज कृष्णकुंजवर लक्ष्मण जगताप यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Mar 20, 2014, 05:01 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
लक्ष्मण जगताप आपल्या आमदारकीचा राजीनामा देणारेय. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचं आव्हान स्वीकारुन ते राजीनामा देणारेत. आज कृष्णकुंजवर लक्ष्मण जगताप यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली.
मावळ आणि रायगड लोकसभा मतदारसंघातले शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार लक्ष्मणराव जगताप आणि रमेश कदम यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सदिच्छा भेट घेतली. जगताप आणि कदम यांना मनसेनं पाठिंबा दिलाय.
याबाबत या दोन्ही नेत्यांनी राज ठाकरेंचे आभार मानले. या मतदारसंघात सभा घेण्याचं आश्वासनही राज ठाकरे यांनी यावेळी दिलं. दरम्यान येत्या दोन दिवसात आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं लक्ष्मण जगताप यांनी यावेळी स्पष्ट केलं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.