www.24taas.com, झी मीडिया, पणजी, नवी दिल्ली
गोव्यात उत्साहात मतदान झाले. सरासरी ७८ टक्के मतदान झाले आहे. दक्षिण गोव्यात 75 टक्केपेक्षा जास्त तर उत्तर गोव्यात 76 टक्केंपेक्षा जास्त मतदान झाले. तर त्रिपुरात 81 टक्के मतदान झाले. तर आसाममध्ये 75 टक्केच्या जवळपास मतदान झाल्याचे सांगण्यात येत आहे.
संध्याकाळी साडेचारपर्यंत उत्तर गोव्यात ७१ टक्के तर दक्षिण गोव्यात ६९ टक्के मतदान झालंय. गोव्यात लोकसभेच्या दोन्ही जागांसाठी आज सकाळी मतदानाला सुरुवात झाली. दोन जागांकरिता इथ १९ उमेदवार रिंगणात आहेत. यासाठी १० लाख ६० हजार ७८० मतदार आपला मतदानाचा हक्क बजावला.
निवडणूक आयोग आणि उमेदवारांनी केलेल्या विशेष प्रयत्नामुळे यावेळी मोठ्या प्रमाणात मतदार मतदानासाठी बाहेर येताना दिसत होते. विशेष म्हणजे मतदानाला सुरुवात होताच तासाभरातच इतं मतदारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. यासाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
उत्तर गोवा लोकसभा मतदार संघासाठी सात उमेदवार असून ५लाख १५ हजार ४४३ मतदार आहेत इथ बहुरंगी लढत असली तर खरी लढत कॉंग्रेस विरुद्ध भाजपा अशीच होईल तर दक्षिणेत १२ उमेदवार रिंगणात असले तरी इथली लढतही भाजपचे नरेंद्र सावईकर आणि काँग्रेसचे अलेक्स रेजिनाल्ड यांच्यात होईल असा अंदाज आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पणजीत आपले मतदान करून गोव्यातल्या दोन्ही जागा चांगल्या फरकाने जिंकू असा दावा केलाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.