निवडणुकीचा सातवा टप्पा : गुजरातमध्ये 62% मतदान

देशातल्या सातव्या टप्प्यासाठी आज मतदान  पार पडलंय. या टप्प्यात सात राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशातवल्या ८९ जागांचा समावेश आहे. गेल्या सहा टप्प्यांसारखाच या टप्प्यातही मतदारांनी चांगला प्रतिसाद दिलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 30, 2014, 09:03 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
देशातल्या सातव्या टप्प्यासाठी आज मतदान  पार पडलंय. या टप्प्यात सात राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशातवल्या ८९ जागांचा समावेश आहे. गेल्या सहा टप्प्यांसारखाच या टप्प्यातही मतदारांनी चांगला प्रतिसाद दिलाय. 
सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी
गुजरात – 62%
पश्चिम बंगाल – 81.35%
दादरा नगर हवेली - 85%
बिहार – 60%
पंजाब 73%
दीव-दमण – 76%
जम्मू-काश्मीर – 25.62%
आंध्रप्रदेश – 70%
उत्तर प्रदेश – 57.10%
सर्वात जास्त मतदान पश्चिम बंगालमध्ये नोंदवलं गेलंय. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अंदाजे पश्चिम बंगालमध्ये 81.35 टक्के मतदान झालंय. गुजरातमध्ये ५६ टक्के मतदान झाले आहे. पंजाबमध्ये तब्बल ६४ टक्के मतदान झाले आहे. तर या दोन्ही राज्यांमध्ये सर्वच्या सर्व जागांसाठी मतदान पार पडलंय.
उत्तर प्रदेशात १४ जागांसाठी मतदान झालं असून पाच वाजेपर्यंत अंदाजे ५४ टक्के मतदान झालंय तर बिहारमध्येही ५४ टक्के मतदान झालंय. या टप्प्यात बडोद्यातून भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी, तर गांधीनगरमधून भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, लखनौमधून राजनाथ सिंग, अमृतसरमधून अरुण जेटली आणि कानपूरमधून मुरली मनोहर जोशी यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय.
काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांचे रायबरेली मतदारसंघातून भवितव्य ठरणार आहे तर जेडीयूचे अध्यक्ष शरद यादव हे बिहारच्या माधेपुरा मतदारसंघातून मैदानात आहेत. नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला श्रीनगरमधून निवडणूक लढवत आहेत. या सर्व दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागल्यानं या टप्प्याकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलंय.
नरेंद्र मोदींनी केलं मतदान
गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी गांधीनगरमधून मतदानाचा हक्क बजावलाय. या मतदारसंघातून लालकृष्ण अडवाणी रिंगणात आहेत. अडवाणींसाठी मतदान करणं हे माझं भाग्य असल्याचं मोदींनी म्हटलंय. गुजरातमध्ये यंदा प्रचार करता आला नाही. फक्त १८ तास देऊ शकलो, त्याबद्दल मला त्यासाठी माफ करा आणि मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं आवाहन मोदींनी केलंय तर मोदींच्या आई हिराबेन यांनीही गांधीनगरमध्ये मतदान केलं. तर मोदींच्या पत्नी जसोदाबेन यांनीही दुपारी १२ वाजून ३९ मिनिटांना मुहुर्त साधत मेहसाणा मतदारसंघातून मतदान केलं.
राजनाथ सिंह, अडवाणींनी केलं मतदान
भाजप अध्यक्ष राजनाथ सिंहांनी लखनऊमध्ये मतदान केलं. राजनाथ सिंह आणि काँग्रेसच्या रिटा बहुगुणामध्ये बिग फाईट आहे. तर गांधीनगरमधून लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या लालकृष्ण अडवाणींनीही आपला मतदानाचा हक्क बजावला.  
...आणि अडवाणी वैतागले!
यावेळी, रेकॉर्ड ब्रेक व्होटींग होईल असं म्हणणाऱ्या लालकृष्ण अडवाणींना ही मोदींची लाट आहे की भाजपची, असा प्रश्न विचारण्यात आला. मात्र, या प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी अडवाणी वैतागले. इलेक्शन कमिशनने केलेल्या चांगल्या कामाला त्यांनी याचं श्रेय दिलं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.