www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
दुपारी १.०० वाजता अपडेट
Ø नाशिक - राष्ट्रवादी काँग्रेसच्या छगन भुजबळ यांचा दारुण पराभव... १ लाख ८७ हजार मतांनी झाला पराभव... महायुतीच्या हेमंत गोडसे यांचा विजय... तर मनसेचे उमेदवार डॉ. प्रदीप पवारांचं डिपॉझिट जप्त
सकाळी ९.३० वाजता अपडेट
Ø नाशिक -भुजबळ 34 हजार मतांनी पिछाडीवर, हेमंत गोडसे आघाडीवर
मतदारसंघ : नाशिक
मतदान दिनांक : 24 एप्रिल
एकूण मतदान : 64 टक्के मतदान
उमेदवार :
काँग्रेस / राष्ट्रवादी – छगन भुजबळ
महायुती – हेमंत गोडसे
मनसे - प्रदीप पवार
आप – विजय बळीराम पांढरे
२००९ : कोण जिंकलं, कोण हरलं
समीर भुजबळ - राष्ट्रवादी - 2,38,706 मतं - 36.34%
दत्ता गायकवाड – शिवसेना – 1,58,251 मतं - 24.09%
हेमंत गोडसे - मनसे - 2,16,674 मतं - 32.98%
मतदारांची संख्या (२००९)
एकूण : 14,48,414
पुरुष : 7,64,374
महिला : 6,84,040
काय सांगतोय निवडणुकांचा इतिहास...
पुतण्या, मुलगा यांची राजकीय सोय लावून देण्याची राज्याच्या राजकारणात प्रथाच पडली आहे. त्यातूनच नाशिकची जहागिरी छगन भुजबळ यांनी पुतणे समीर यांच्याकडे सोपविली. समीर तुमच्या झोळीत टाकत आहे, असे भावनिक आवाहनही केले. नाशिककरांनी समीरला निवडून दिले.
छगन भुजबळ यांचे भरभक्कम पाठबळ लाभल्याने खासदारांनी मतदारसंघांमध्ये कामांचा धडाका लावला. सार्वजनिक बांधकाम खाते भुजबळ यांच्याकडेच असल्याने या खात्याचे नाशिकवर जरा जास्तच प्रेम.
लोकांच्या नजरेस भरेल अशी कामे झाली. तरीही समीर भुजबळ हे मतदारांच्या मनात भरलेले दिसत नाहीत.
यामुळेच बहुधा आगामी निवडणुकीत समीर यांच्याऐवजी त्यांचे काका छगन भुजबळ यांनी लोकसभेची निवडणूक लढवावी, अशी भूमिका राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मांडली आणि मोठय़ा भुजबळांनी ती तात्काळ मान्य केली.
परिणामी नाशिकमधील लहानसहान कार्यक्रमांमध्ये छगन भुजबळ हे हजेरी लावू लागले आहेत.
काका लोकसभेत तर पुतणे येवल्यात असे चित्र राहणार आहे. नाशिकची जहागिरी राखण्याचे भुजबळांसमोर मोठे आव्हान आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.