www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
लोकसभा निवडणुकांच्या रणसंग्रामात आज राज्यात तिस-या टप्प्यातल्या मतदानाला सुरुवात झाली खरी मात्र, मतदार यादीतील घोळ अजुनही कायम आहे. पुणे, औरंगाबाद, मराठवाडा, कोकण आदी ठिकाणी मतदारांची नावे गायब झाली होती. तसचा प्रकार मुंबईतही उघड झाला आहे. अनेक सेलिब्रिटींची नावे नसल्याने त्यांना मतदानाचा हक्क बजावता आला ऩाही.
अभिनेता अतुल कुलकर्णी याचे मतदान यादीतून नाव गायब झालेय. अतुल मतदानासाठी केंद्रावर केला असता त्याचे नाव नसल्याचे पुढे आले. त्याला यावेळी मतदान करण्यापासून रोखण्यात आले. तसेच अभिनेता स्वप्नील जोशी, अभिनेत्री वंदना गुप्ते यांचेही नाव नसल्याने त्यांना मतदान करता आले नाही.
तसेच व्यापारी जगतातील दिग्गज के. व्ही. कामत, दीपक पारेख यांचीही नावे मतदार यादीत नाहीत. त्यामुळे त्यांना मतदान करता आले नाही.
दरम्यान, नाशिकमध्येही मतदान यादीत घोळ असल्याचे दिसून आले. बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या आई हिराबाई भुजबळ यांचे नाव यादीतून गायब झालेत. तर ठाण्यातील सेंट जॉर्ज शाळेत मतदान मशिन बंद पडले. मतदान थांबविण्यात आले होते. असाच प्रकार कळवा येथेही घडला.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.