www.24taas.com, झी मीडिया, रायपूर
काँग्रेसची स्टार प्रचारक आणि सिनेअभिनेत्री नगमा हिला पुन्हा एकदा छेडछाडीला सामोरं जावं लागलंय. रायपूरमध्ये प्रचारासाठी दाखल झालेल्या नगमाला छेडछाडीमुळे वैतागून सरतेशेवटी रॅली अर्धवट सोडून जावं लागलं. पण, यामुळे तिचा राग काही शांत झालं नाही. हॉटेलमध्ये पोहचल्यानंतर ती सव्वा तीन तास एका रुममध्ये बसून राहिली. त्यामुळे तिचा प्रचारापेक्षा जास्त वेळ रागामध्येच गेला.
नगमा छत्तीसगडमध्ये दोन दिवसांच्या प्रचारासाठी दाखल झाली होती. सोमवारी सकाळी काँग्रेस भवनात प्रेस कॉन्फरन्सदरम्यान झालेल्या गर्दीमुळेही ती चांगलीच वैतागली होती. तिथून ती १२ वाजता सुरक्षेसहीत निघाली होती. यानंतर पंडरीस्थित नुरानी चौक पोहचली तेव्हा काही कार्यकर्ते खुर्च्यांवर बसलेले होते. त्यांनी नगमाला घेरलं. काहींनी तिचा हात पकडण्याचाही प्रयत्न केला. यामुळे ती चांगलीच नाराज झाली.
कसंबसं पाच मिनिटं भाषण करून ती तिथून तडक निघाली आणि हॉटेलवर निघून गेली. इथं ती तीन तासांपेक्षा जास्त वेळ एकटीच होती. काँग्रेसचे प्रदेश सचिव आणि शिवसिंह ठाकूर यांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला पण तिचा राग काही गेला नाही.
मेरठमध्ये स्वागतासाठी ३०-४० गाड्या हजर होत्या मात्र इथं अशी काहीही सोय केलेली नव्हती, असं नगमाच्या पीए हनीफ यांनी सांगितलं. त्यानंतर दिल्ली कंट्रोल रुमवरून फोन आल्यानंतर तिचा राग थोडा शांत झाला.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.