`कमळ` झळकावल्यानं मोदींविरोधात काँग्रेसची तक्रार

कालपर्यंत सूटवर लावलेलं कमळ आज मोदींनी हातात घेतलं. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर मोदींनी कमळ हातात घेऊन पत्रकार परिषद घेतली. मोदीचं हेच कमळ हातात घेणं काँग्रेसला आक्षेपार्ह वाटलंय. काँग्रेसनं मोदींविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. मोदींची उमेदवारी रद्द करण्याची मागणी काँग्रेसनं केलीय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Apr 30, 2014, 01:12 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, अहमदाबाद
कालपर्यंत सूटवर लावलेलं कमळ आज मोदींनी हातात घेतलं. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर मोदींनी कमळ हातात घेऊन पत्रकार परिषद घेतली. मोदीचं हेच कमळ हातात घेणं काँग्रेसला आक्षेपार्ह वाटलंय. काँग्रेसनं मोदींविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. मोदींची उमेदवारी रद्द करण्याची मागणी काँग्रेसनं केलीय.
मोदींनी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास गांधीनगरमध्ये मतदान केलं. मतदान केंद्रातून बाहेर आल्यानंतर मोदींनी `कमळ` चिन्ह हातात घेऊन लोकांना दाखवलं. यावेळी मोदींनी आपल्या मोबाइलमधून मतदान केल्याचा सेल्फी फोटोही काढला. यानंतर किमान २० मिनिटं मोदींनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार `परिषदेवेळीही मोदी कमळ चिन्ह हातात घेऊन सतत कॅमेऱ्यासमोर दाखवण्याचा प्रयत्न करत होते, असा काँग्रेसचा आरोप आहे.
काँग्रेसनं मोदींचा हा प्रकार म्हणजे आचासंहितेचा भंग असल्याचा आरोप केला आहे. `मोदींनी आचारसंहितेचा भंग करत प्रचार केला आहे. यामुळं निवडणूक आयोगाकडे याप्रकरणी मोदींची तक्रार करणार` असल्याचं गुजरात काँग्रेसनं म्हटलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.