पालघर मतदारसंघाकडे सर्वाचं लक्ष

ठाणे जिल्ह्यात पालघर मतदारसंघाकडे सर्वाचं लक्ष लागलंय. यंदा पालघर मतदारसंघ काबीज करण्यासाठी भाजप आणि हितेंद्र ठाकूर यांनी कंबर कसलीये. बहुजन विकास आघाडीनं विद्यमान खासदार बळीराम जाधव यांना पुन्हा उमेदवारी दिलीये. काँग्रेसनं उमेदवार राजेंद्र गावीत यांचा अर्ज मागे घेत बहुजन विकास आघाडीला पाठिंबा दिलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 11, 2014, 09:39 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पालघर
पालघर मतदारसंघात काँग्रेसनं माघार घेतल्यानं बहुजन विकास आघाडी आणि भाजपा अशी दुहेरी लढत आहे. मात्र काँग्रेसचे माजी खासदार दामु शिंगडा यांनी बंडखोरी करत आपल्या मुलाला रिंगणात उतरवलंय. त्यामुळं निवडणुकीत चुरस वाढलीये.
ठाणे जिल्ह्यात पालघर मतदारसंघाकडे सर्वाचं लक्ष लागलंय. यंदा पालघर मतदारसंघ काबीज करण्यासाठी भाजप आणि हितेंद्र ठाकूर यांनी कंबर कसलीये. बहुजन विकास आघाडीनं विद्यमान खासदार बळीराम जाधव यांना पुन्हा उमेदवारी दिलीये. काँग्रेसनं उमेदवार राजेंद्र गावीत यांचा अर्ज मागे घेत बहुजन विकास आघाडीला पाठिंबा दिलाय.
या मतदारसंघात 2009 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे दामु शिंगडा तिस-या क्रमाकांवर गेले होते. काँग्रेसची या मतदारसंघात ताकद कमी आहे. त्यामुळं भाजपचा विजय होऊ नये म्हणून काँग्रेसनं बहुजन विकास आघाडीला पाठींबा दिलाय.
दुसरीकडं पाच वेळा खासदार राहिलेले काँग्रेसचे दामू शिंगडा यांनी बंडखोरी करत आपला मुलगा सचिन शिंगडा यांना रिंगणात उतरवलंय. त्यामुळं चुरस वाढलीये. पालघर मतदारसंघात आदीवासी मतदारांपाठोपाठ वसई, नालासोपारा, विरार सारख्या शहरी भागातील गुजराती मतदार जास्त असल्यामुळे तसंच मोदी लाटेमुळे भाजपचं पारडं जड होत चाललंय. तसंच वसईचे आमदार विवेक पंडीत यांनी भाजपला पाठींबा दिलाय. मोदी फॅक्टरचा आम्हाला फायदा होईल, असं भाजपचे उमेदवार चिंतामन वनगा यांनी सांगितलंय.
पालघर मतदारसंघातल्या तलासरी विक्रमगड परीसरात कम्युनिस्ट पक्षाचा जोर आहे. पक्षानं लाडक्या खरपडे यांनी उमेदवारी दिलीये. आम आदमी पार्टीने पांडुरंग पारधी यांना रिंगणात उतरवलंय. मात्र खरी लढत ही बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव विरुद्ध भाजपचे चिंतामन वनगा, अशी पाहायला मिळणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.