काँग्रेसविरोधात मुंबईत उघड बंड

मुंबई कॉंग्रेसचे सरचिटणीस अजित सावंत यांनी कॉंग्रेसविरोधात उघड बंड केलं आहे. तिकीट वाटपाच्यावेळी पैसे घेतल्याचा आरोप मुंबई कॉंग्रेसचे सरचिटणीस अजित सावंत यांनी केला आहे. सामन्य कार्यकर्त्यांवर अन्याय झाला आहे. सावंत हे गुरूदास कामत गटाचे कट्टर समर्थक मानले जात आहेत. त्यामुळे कामत गटातील कार्यकर्त्यांनी डावल्याची चर्च आहे. अन्याय झाल्याचे सांगत मीना देसाई, कमलेश यादव यांनी बंडखोरीचा पर्याय स्वाकारला आहे.

Updated: Jan 31, 2012, 04:14 PM IST

www.24taas.com, मुंबई  

 

मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस अजित सावंत यांनी काँग्रेसविरोधात उघड बंड केलं आहे. तिकीट वाटपाच्यावेळी पैसे घेतल्याचा आरोप  मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस अजित सावंत यांनी केला आहे.

 

सामन्य कार्यकर्त्यांवर अन्याय झाला आहे. सावंत हे गुरूदास कामत गटाचे कट्टर समर्थक मानले जात आहेत. त्यामुळे कामत गटातील कार्यकर्त्यांनी डावल्याची चर्च आहे.

 

तिकीटवाटपाच्या वेळी आर्थिक सौदेबाजी झाली असून कार्यकर्त्यांना डावलून तिकीटवाटप करण्यात आल्याचे ते म्हणाले. मला पक्षातून काढून टाकले तरी चालेल. मात्र, मी पक्षाच्या उमेद्‌वाराच्या विरोधात प्रचार करणार असल्याचा इशाराही  सावंत यांनी दिला आहे.

 

 

काँग्रेसचे मुंबई शहराध्यक्ष कृपाशंकर सिंह यांनी पैसे घेऊन तिकीटवाटप केले असल्याचा आरोप सावंत यांनी आज येथे केला. माहीम मतदारसंघातून कॉंग्रेसने माजी आमदार सदा सरवणकर यांचे चिरंजीव समाधान सरवणकर यांना उमेद्‌वारी दिल्याने सावंत यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली.

 

सदा सरवणकर हे काँग्रेसचे माजी आमदार आहेत. ते माहिममधील नेते आहेत. विधानसभा निवडणुकीच्या वेळी या मतदारसंघातून सावंत यांना उमेद्‌वारी देण्यात आली होती. मात्र, महानगरपालिकेच्या या निवडणुकीत त्यांना डावलण्यात आले आहे. त्यामुळे त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

 

 

 

दरम्यान,  कमलेश यादवही यांनी बंडखोरीचे निशान फडकविले असताना चांगल्या कामाची दखल घेवून ज्यांचा गौरव केलेल्या काँग्रेसच्या मीना देसाई यांचीही बंडखोरी केली आहे. त्या अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. तसे त्यांनी जाहीरही केले आहे.