जळगावात देवकरांच्या कार्यकर्त्यांना अटक

जळगावचे पालकमंत्री गुलाबराव देवकरांच्या भावासाठी पैसे वाटताना राष्ट्रवादीच्या 3 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.

Updated: Feb 7, 2012, 10:30 AM IST

www.24taas.com, जळगाव

 

जळगावचे पालकमंत्री गुलाबराव देवकरांच्या भावासाठी पैसे वाटताना राष्ट्रवादीच्या 3 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.  उमाळे गावात भाजपच्या कार्यकर्त्यांनी या तिघांना गोपाळ देवकरांसाठी पैसे आणि दारु वाटताना पकडलं. यावेळी 45 हजार रुपये रोख आणि दारुचे दोन पेट्या जप्त करण्यात आलेत.

 

दरम्यान  लातूरमधल्या उद्गीर तालुक्यातल्या सोमनाथपूरमध्ये कॉंग्रेस कार्यकर्त्यांची गाडी फोडण्यात आलीय. सोमनाथपूरमध्ये कॉंग्रेस कार्यकर्ते पैसे वाटत असताना ग्रामस्थांनी काँग्रेस कार्यकर्त्यांची गाडी फोडली. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानं त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.