राजकारणाच्या पटलावर ममता बॅनर्जी यांचे वेगळेच स्थान आहे. खूप मेहनतीनंतर त्यांनी आपले राजकीय स्थान मिळवले आहे. ममता या बिनधास्त आहेत, त्या कोणत्यावेळी कोणाची साथ देतील आणि सोडून देतील हे कोणी सांगू शकत नाही. एकेकाळी त्या यूपीए सरकारमध्ये सहभागी होत्या. पण आपल्या अटींवर सरकारने काम केले नाही म्हणून त्या सरकारमधून बाहेर पडल्या.
ममता निवडणुकांनंतर काँग्रेसची साथ देणार की मोदीच्या नेतृत्त्वाच्या एनडीएसोबत जाणार हे अजून माहित नाही. ममता एक चतुर राजकारणी आहेत. त्या योग्यवेळी विचारपूर्वक आपली राजकीय खेळी खेळतात. या धैर्यामुळे आणि अनोख्या अंदाजामुळे ममता बॅनर्जी यांना २०१२ मध्ये टाइम मॅगझीनने जगातील १०० प्रभावी व्यक्तींच्या यादीत स्थान दिले होते. बऱ्याच अशा घटना घडल्या त्यामुळे ममता बॅनर्जी यांचे व्यक्तिमत्व एक सनकी, हट्टी आणि आत्मप्रशंसामध्ये बुडलेल्या राजकारण्याची झाली. अनेक चुका करूनही लोकशाहीच्या मूल्यांचे पालन करणे त्या योग्य समजत नाही अशी झाली आहे.
ममता बॅनर्जीही पंतप्रधानपदाच्या प्रबळ दावेदार होऊ शकतात. परंतु, याची शक्यता सध्या कमी वाटते. ममता यांची राजकीय महत्वाकांक्षा पीएम बनण्याची नाही असे आपण म्हणू शकत नाही. ममतांचे राजकारण हे चतूर राजकारण आहे. ऐन मोक्यावर त्या आपले राजकीय पत्ते खुले करतात.
ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालच्या ११ व्या आणि विद्यमान मुख्यमंत्री आहेत. राज्याच्या त्या पहिल्या महिला मुख्यमंत्री आहेत. १९९७ मध्ये काँग्रेसशी फारकत घेऊन त्यांनी आखिल भारतीय तृणमूल काँग्रेस (टीएमसी) पक्ष स्थापन केला आणि अध्यक्ष झाल्या. ममता बॅनर्जी यांना सामान्यतः दीदी म्हणतात. २०११मध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी माकप आणि डाव्या दलांच्या ३४ वर्षांच्या सरकारला उखडून फेकून दिले.
यापूर्वी केंद्र सरकारमध्ये त्या दोन वेळा रेल्वे मंत्री होत्या. रेल्वे मंत्री होणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. त्या केंद्रात कोसळा, मानव संसाधन विकास राज्यमंत्री, युवा आणि क्रीडा, तसेच महिला आणि बालकल्याण राज्यमंत्री होत्या.
ममता बॅनर्जी यांचा जन्म ५ जानेवारी १९५५ कलकत्ता (आता कोलकता) मध्ये एका बंगाली ब्राम्हण कुटुंबात झाला. मध्य वर्गीय दाम्पत्य असलेले प्रमिलेश्वर बॅनर्जी आणि गायत्री देवी यांच्या घरात ममता यांचा जन्म झाला. त्या लहान असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. आपल्या शालेय जीवनापासूनच त्या राजकारणाशी जोडल्या गेल्या. ७० च्या दशकात त्या राज्य महिला काँग्रेसच्या महासचिव बनविण्यात आले. त्यावेळी त्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत होत्या.
आपल्या संपूर्ण राजकीय जीवनात ममता यांना नेहमी साधी जीवन शैलीला प्राधान्य दिले. त्या नेहमी पारंपारिक बंगाली सूती साडी (बंगालीमध्ये तीला तांत म्हणतात) परिधान केली. त्यांनी कधीही कोणतेही आभूषण किंवा मेकअप केला नाही. त्या अविवाहीत आहेत. त्यांच्या खांद्यावर नेहमी सूती पिशवी लटकलेली आपल्याला दिसते. ही त्यांची ओळख बनली आहे.
ममता यांनी आपली राजकीय कारकिर्द काँग्रेसपासून सुरूवात केली. १९७६ ते १९८० पर्यंत त्या महिला काँग्रेसच्या महासचिव होत्या. १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत भारतातून सर्वात कमी वयाच्या खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. जादवपूर मतदारसंघातून त्यांनी अनुभवी डावे नेता सोमनाथ चॅटर्जी यांना पराभूत केले. त्या युवा काँग्रेसच्या महासचिवही बनल्या होत्या. १९८९मध्ये काँग्रेस विरोधी लाटेत त्या आपली जागा राखू शकल्या नाही. १९९१ ची निवडणूक कलकत्ता दक्षिण मतदारसंघातून लढवली. आजपर्यंत त्या या जागेवरून जिंकू येत आहेत.
१९९१ मध्ये पी. व्ही. नरसिंहराव यांच्या सरकारमध्ये त्या मनुष्यबळ विकास मंत्री, युवा आणि क्रीडा तसेच महिला आणि बाल कल्याण राज्यमंत्री होत्या. १९९९मध्ये त्यांनी भाजपच्या नेतृत्त्वाखाली एनडीए सरकारमध्ये सामील झाल्या होत्या. त्यावेळी त्यांना रेल्वे मंत्री बनविण्यात आले होते. २००२ मध्ये त्यांनी रेल्वे बजेट सादर केले. या बजेटमध्ये त्यांनी बंगालला सर्वाधिक सुविधा देऊन सिद्ध केले की त्या बंगालपेक्षा अधिक व्यापक विचार करू शकत नाही.
२००१ मध्ये तहलका प्रकरणानंतर ममता बॅनर्जी यांनी एनडीएची साथ सोडली. पण जानेवारी २००४ मध्ये पुन्हा सरकारमध्ये सामील झाल्या. २० मे २००४ मध्ये पक्षाकडून त्यांनी निवडणूक जिंकली. त्यांना कोसळा आणि खाण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली. २० ऑक्टोबर २००५ मध्ये त्यांनी प. बंगालच्या बुद्धदेव भट्टाचार्य सरकार विरोधात औद्योगिक विकासाच्या नावावर शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी बळकावल्या प्रकरणी विरोध केला.
२००९ मध