नागपुरात दारुचा मोठा साठा जप्त

जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपुरात मोठ्या प्रमाणात दारु पकडण्यात आली.

Updated: Feb 7, 2012, 02:01 PM IST

www.24taas.com,नागपूर- अखिलेश हळवे

 

जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपुरात मोठ्या प्रमाणात दारु पकडण्यात आली. पोलिसांनी एका गाडीतून लाखो रुपयांची दारू जप्त केलीय. त्याच गाडीतून काँग्रेस उमेदवाराचं प्रचार साहित्यही जप्त करण्यात आलं. दरम्यान आज  होणा-या निवडणूकीसाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

 

याच झायलो गाडीतून पोलिसांनी लाखो रुपयांची दारू जप्त केलीय. तब्बल 32 पेट्या  दारू या गाडीतून पोलिसांनी जप्त केलीय.  जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना प्रलोभण देण्यासाठी ही दारू नेली जात असल्याचं तपासात समोर आलंय. विशेष म्हणजे गाडीतून एका काँग्रेस उमेदवारांच्या प्रचाराचं साहित्यही मिळालं आहे. मध्येप्रदेशातून ही दारू वर्ध्यात नेली जात होती. सुरेश वाघमारे यांच्या नावाने ही दारू जात होती.

 

दरम्यान आज होणा-या जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवलाय. नागपूर जिल्ह्यात 2 हजारांपेक्षा जास्त निवडणूक केंद्र आहेत. त्यापैकी 312 संवेदनशील आणि 6 अतिसंवेदनशील आहेत. त्यामुळे एकीकडे गुंडगिरीला आळा घालणे. त्याचबरोबर दारू आणि पैशाच्या माध्यमातून मतदारांना प्रलोभन देण्याच्या प्रकारावरही पोलिसांना करडी नजर ठेवावी लागणार आहे.

 

 

 

 

Tags: