www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
छगन भुजबळ यांच्या आणखी एक आरोपाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे. आरोपाला उत्तर देतांना राज ठाकरेंनी छगन भुजबळांचं एक उदाहऱणही दिलं आहे.
आरोपाला उत्तर देतांना राज ठाकरे म्हणाले, "बाबासाहेब आंबडेकर यांच्या एका पुस्तकाविषयी वाद निर्माण झाला होता, तेव्हा छगन भुजबळ हे मुंबईचे महापौर होते, पुस्तकाच्या वादावरून दलित बांधवांचा मुंबईत मोठा मोर्चा निघाला, यावेळी हुतात्मा चौकाची नासधूस झाली, ती दलित बांधवांनी केली असा आरोप भुजबळांचा होता, यावरून भुजबळांनी त्यावेळी हुतात्मा स्मारक गो मूत्र शिंपडून, धुतलं होतं, असा घणाघाती आरोप राज ठाकरे यांनी छगन भुजबळांवर केलाय.
तुम्हाला याचे संदर्भ अजुनही त्या वेळेसच्या जुन्या वर्तमान पत्रात मिळतील असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. भुजबळांनी आपल्या संस्थेला स्व:तचं नाव दिलं, पण महात्मा फुलेंचं नाव दिलं नाही, अशा माणसाने मला फुले आणि डॉ. आंबेडकर शिकवू नयेत, असं राज ठाकरे यांनी म्हटलंय.
छगन भुजबळांनी यापूर्वी राज ठाकरे यांच्यावर आरोप केले होते, या आरोपांना राज ठाकरे यांनी हे उत्तर दिलं आहे.
भुजबळांनी नाशिकच्या सभेत राज ठाकरे यांच्यावर केलेले आरोप
राज ठाकरे यांच्या घराजवळ चैत्यभूमी आहे, पण राज ठाकरे तिथं कधी अभिवादन करायला गेले नाहीत, आणि ते मला शाहू आणि फुले शिकवणार का? चैत्यभूमीचं सोडा, बाळासाहेबांच्या प्रथम स्मृतीदिनी दादरच्या शिवाजी पार्कवर देशभरातील नेते आले, पवार साहेबही दिल्लीतून अभिवादन करायला आले, पण राज ठाकरे सकाळी या ग्राऊंडच्या आजूबाजूला कुत्रा फिरवतात, पण ते तिथे बाळासाहेबांना अभिवादन करायला गेले नाहीत, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं होतं. छगन भुजबळ यांच्या आरोपांना राज ठाकरेंनी आज उत्तर दिलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.