`मरा पण नेत्यांना मारुन मरा`, राज ठाकरेंचं वादग्रस्त विधान

वीज, पाणी तसंच दळवळणाच्या सुविधा नसल्यानंच विदर्भातला शेतकरी देशोधडीला लागलाय, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलाय. आत्महत्या हा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरचं उत्तर नसून `मरा पण नेत्यांना मारुन मरा`, असं वादग्रस्त विधानही त्यांनी यावेळी केलं. ते यवतमाळमध्ये मनसे उमेदवार राजू पाटील यांच्या प्रचारसभेत बोलत होते.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Apr 8, 2014, 10:47 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, यवतमाळ
वीज, पाणी तसंच दळवळणाच्या सुविधा नसल्यानंच विदर्भातला शेतकरी देशोधडीला लागलाय, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलाय. आत्महत्या हा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरचं उत्तर नसून `मरा पण नेत्यांना मारुन मरा`, असं वादग्रस्त विधानही त्यांनी यावेळी केलं. ते यवतमाळमध्ये मनसे उमेदवार राजू पाटील यांच्या प्रचारसभेत बोलत होते.
शिवसेना खासदार भावना गवळी यांनी यवतमाळमध्ये रेल्वे आणली असती तर आपण त्यांचा प्रचार केला असता, असं राज यांनी सांगितलं. विदर्भात मनसेनं केवळ यवतमाळमध्ये उमेदवार उभा केलाय. त्याला मी एकच सांगतो असं राज ठाकरे म्हणाले, "यवतमाळच्या तरुणांना राज्यातील कुठल्याही शहरात रोजगारासाठी जाता येईल, अशी दळण-वळण यंत्रणा उभी कर".
यवतमाळमध्ये रेल्वे नाही. पण आज उत्तर प्रदेश आणि बिहारमधून रोज ४८ ट्रेन्स भरून येतात. या गाड्यांमधून आलेली ही माणसं कुठे जातात? पुणे, ठाणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर या शहरांमध्ये. त्यांच्या हाताला काम मिळते पण इथल्या मराठी मुलांच्या हाताला मात्र काम नाही. हा प्रश्न खासदारानं सोडवालयला हवा.
यवतमाळमध्ये ४५०हून अधिक आदिवासी कुमारी माता आहेत. कंत्राटदार इथल्या आदिवासी मुलींना नोकरीचं आमिष देवून त्यांची फसवणूक करतात. यवतमाळच्या खासदार एक महिला आहेत, तरीही त्यांनी या प्रश्नाला वाचा फोडली नाही, ही मुद्दाही राज ठाकरेंनी आपल्या भाषणात मांडला.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.