नाराज आठवले मोदींच्या शपथविधीला गैरहजर

भारताच्या 15व्या पंतप्रधान पदी नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतलीय. या शपथविधी समारंभाला 4000 निमंत्रित उपस्थित होते. सार्कच्या प्रतिनिधी राष्ट्राच्या प्रमुखांसह देशातील नेते, सेलिब्रेटीही उपस्थित होते. मात्र एनडीएचा घटक पक्ष असलेल्या आरपीआयचे रामदास आठवले हे मात्र शपथविधी समारंभाला गैरहजर राहिले.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: May 26, 2014, 09:02 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
भारताच्या 15व्या पंतप्रधान पदी नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतलीय. या शपथविधी समारंभाला 4000 निमंत्रित उपस्थित होते. सार्कच्या प्रतिनिधी राष्ट्राच्या प्रमुखांसह देशातील नेते, सेलिब्रेटीही उपस्थित होते. मात्र एनडीएचा घटक पक्ष असलेल्या आरपीआयचे रामदास आठवले हे मात्र शपथविधी समारंभाला गैरहजर राहिले.
निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर लगेचच रामदास आठवले यांनी दिल्ली गाठली होती. त्यांना मंत्रीपद मिळण्याची आशा होती. मात्र त्यांना मंत्रीपद मिळालं नसल्यानं त्यांनी मोदींच्या शपथविधी समारंभाला गैरहजर राहण्याचा निर्णय घेतल्याचं कळतंय.
रामदास आठवले हे भाजपच्या जागेवर राज्यसभेचे खासदार झाले आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.