अखेर नाराज गितेंनी स्वीकारला पदभार!

शिवसेनेचे नाराज मंत्री अनंत गिते यांनी अखेर आज आपल्या अजवड उद्योग मंत्रालयाचा पदभार स्वीकारला आहे. शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले तरी शिवसेनेला एकच मंत्रीपद ते ही मोठं नाही, त्यामुळं शिवसेना आणि उद्धव ठाकरे नाराज झाले होते.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: May 28, 2014, 12:42 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
शिवसेनेचे नाराज मंत्री अनंत गिते यांनी अखेर आज आपल्या अजवड उद्योग मंत्रालयाचा पदभार स्वीकारला आहे. शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले तरी शिवसेनेला एकच मंत्रीपद ते ही मोठं नाही, त्यामुळं शिवसेना आणि उद्धव ठाकरे नाराज झाले होते. मात्र आता ही नाराजी दूर झाल्याचं कळतंय. त्यामुळंच अनंत गितेंनी आज आपल्या मंत्रालयाचा कारभार स्वीकारलाय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर गितेंनी हे मंत्रीपद स्वीकारलं. नरेंद्र मोदी आणि उद्वव ठाकरे यांच्यात अनेक विषयावर सविस्तर चर्चा झाल्याचं गितेंनी सांगितलं. त्याचबरोबर येत्या महिन्याभरात मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यावेळी शिवसेनेला आणखी एखादं मंत्रीपद मिळण्याची शक्यता असल्याचं अनंत गिते यांनी सांगितलं.
नाराजीबाबत बोलताना अनंत गिते म्हणाले, शिवसेना ही लोकाभिमूख संघटना आहे. आम्हाला लोकांची जास्तीत जास्त कामं करता यावीत, यासाठी जनतेचे प्रश्न सोडवण्यासंबंधीचं मंत्रीपद हवं होतं. एकूणच काय आणखी एक मंत्रीपद मिळण्याच्या आश्वासनावर शिवसेनेची सध्यातरी नाराजी दूर झालीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.