...जेव्हा नरेंद्र मोदींवर त्यानं बूट भिरकावला!

रविवारी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर एका तरूणानं बूट भिरकावला. या ‘बूट कांडा’पासून मोदी थोडक्यात बचावले.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 5, 2014, 12:19 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, अलाहाबाद
रविवारी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर एका तरूणानं बूट भिरकावला. या ‘बूट कांडा’पासून मोदी थोडक्यात बचावले.
अलाहाबाद परेड ग्राऊंडमध्ये मोदींनी आपल्या भाषणाला सुरुवात केलीच होती की एका तरुणानं मोदींवर निशाणा साधला. त्यानं मोदींवर त्याच्या हातात असलेला बूट भिरकावला. परंतु, मोदींचं नशिब बलवत्तर म्हणून उपस्थितांसमोर ‘बूट’ खाणं टळलं. हा बूट त्यांच्यापर्यंत पोहचलाच नाही. स्टजपेक्षा बऱ्याच दूर अंतरावर हा बूट जाऊन पडला. यावेळी या तरुणानं ‘ना-ना मोदी’ अशा घोषणाही दिल्या.
यामुळे, थोड्या वेळासाठी उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडाली. सावध झालेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी बूट भिरकावणाऱ्या तरुणाला सभास्थळावरून हाकलून लावलं. यावेळी, त्याला मारहाणही करण्यात आली. पोलिसांनी या कार्यकर्त्यांच्या तावडीतून त्याची सुटका केली. या तरुणाची थोड्यावेळ चौकशी करून मोदींची रॅली संपल्यानंतर पोलिसांनी त्याला सोडून दिलं.
या तरुणाचं नाव तेज प्रताप सिंह असून तो मुळचा चित्रकूटचा असल्याचं समोर येतंय. हा तरुण व्यावसायानं वकील असून अलाहाबाद हायकोर्टात तो प्रॅक्टीस करतो.
याआधी, राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, मनमोहन सिंह, काँग्रेसचे महासचिव जनार्दन त्रिवेदी, गृहमंत्री पी चिंदबरम यांनाही वेगवेगळ्या कारणांनी `बूट कांडा`ला सामोरं जावं लागलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.