निवडणुकांमध्ये सोशल मीडिया होणार मालामाल!

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी, आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल हे दोन्ही नेते आपल्या समर्थकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी ट्विटर आणि फेसबुकचा जोरदार वापर करतायेत. यंदा इतर राजकीय पक्षही मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर प्रचारासाठी करत आहेत.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Mar 25, 2014, 06:04 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, नवी दिल्ली
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी, आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल हे दोन्ही नेते आपल्या समर्थकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी ट्विटर आणि फेसबुकचा जोरदार वापर करतायेत. यंदा इतर राजकीय पक्षही मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर प्रचारासाठी करत आहेत.
निवडणूक आयोगाच्या अंदाजानुसार ८० कोटी मतदारांमध्ये ६० ते ७० टक्के लोक इंटरनेटच्या क्षेत्रात नाही आहेत. तरी सुद्धा राजकीय पक्ष डिजिटल मार्केटिंगवर खूप जोर देत आहेत. हा सोशल मीडिचाच प्रताप आहे की आता लालू सुद्धा ट्वीट करू लागले आहेत.
एसोचॅमच्या रिपोर्टनुसार गूगल, ट्विटर आणि फेसबुकची कमाई या लोकसभा निवडणुकीमुळं खूप जास्त वाढणार आहे. २००९च्या तुलनेत सर्वच पक्ष सोशल मीडियावर भरपूर खर्च करतायेत. जवळपास ४०० कोटींच्या घरात हा खर्च होऊ शकतो असं एसोचॅमचे महासचिव डी. एस. रावत यांनी म्हटलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.