निवडणुकीमुळे ४७६ पेपर मुंबई विद्यापीठाने पुढे ढकलले

लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यात खऱ्या मात्र, याचा फटका दहावीच्या विद्यार्थ्यांना बसला आहे. लोकसभा निवडणुकांमुळे मुंबई विद्यापीठाने काही परीक्षांच्या तारखा पुढे ढकलल्या आहेत. निवडणुका आणि परीक्षा एकाच वेळी आल्यानं सुमारे ४७६ पेपर पुढे ढकलले आहेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 6, 2014, 01:24 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यात खऱ्या मात्र, याचा फटका दहावीच्या विद्यार्थ्यांना बसला आहे. लोकसभा निवडणुकांमुळे मुंबई विद्यापीठाने काही परीक्षांच्या तारखा पुढे ढकलल्या आहेत. निवडणुका आणि परीक्षा एकाच वेळी आल्यानं सुमारे ४७६ पेपर पुढे ढकलले आहेत.
महाराष्ट्रात तीन टप्प्यांत निवडणुका होत आहेत. मुंबईत २४ तारखेला, तर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत १७ तारखेला मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या तारखेच्यावेळी जे पेपर असतील ते पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १६, १७, २३ आणि २४ एप्रिलचे पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत. मुंबई आणि सिंधुदुर्ग-रत्नागिरी मध्ये एप्रिल महिन्याच्या १६, १७, २३ आणि २४ तारखेला मतदान होणार आहे.
मुंबई आणि सिंधुदुर्ग-रत्नागिरीत दोन टप्प्यांत मतदान होतं आहे. या मतदानांच्या दरम्यानच मुंबई विद्यापीठांच्या अनेक परीक्षा आहेत. मुंबई विद्यापीठाअंतर्गत ६ जिल्हे येतात. मुंबई, ठाणे, रत्नागिरी, कल्याण, सिंधुदुर्ग आणि रायगड या ठिकाणचे पेपर पुढे ढकलण्यात आलेत. यामध्ये कला- २२६, कॉमर्स-६८, विज्ञान-१६६, तंत्रज्ञान-१६ पेपर्सचा समावेश
निवडणुकीमुळं १७ आणि २४ एप्रिलचे पेपर पुढे होणार आहेत.
निवडणूक आयोगाला मतदानासाठी अनेक महाविद्यालयांची गरज भासते. त्यामुळे मतदानाच्यावेळी असणारे पेपर पुढे ढकललेत. त्यामुळे या चार दिवसातल्या परीक्षा पुढे गेल्या आहेत. दरम्यान, पुणे विद्यापीठाच्या परीक्षांच्या तारखांमध्ये मात्र कोणताही बदल होणार नाही, असे सूत्रांकडून सांगण्यात आलेय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.