सुप्रिया सुळे 22 हजार मतांनी आघाडी

सुप्रिया सुळे सहा हजार मतांनी पिछाडीवर आहेत, त्यांना बारामतीतून आघाडी मिळाली असली तरी, दौंड, पुरंदरमधून त्यांचं मताधिक्य कमी होतांना दिसतंय

Updated: May 16, 2014, 12:13 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, बारामती
update 12.07 PM राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी 22 हजाराची आघाडी घेतली आहे. काही वेळ सुप्रिया सुळेचं दौंड आणि पुरंदरमधून मताधिक्य कमी झालं होतं. मात्र सुप्रिया सुळे यांनी पुन्हा 22 हजारांची आघाडी घेतली आहे.
update 11.45 AM सुप्रिया सुळे सहा हजार मतांनी पिछाडीवर आहेत, त्यांना बारामतीतून आघाडी मिळाली असली तरी, दौंड, पुरंदरमधून त्यांचं मताधिक्य कमी होतांना दिसतंय, यामुळे सुप्रिया सुळे या पराभवाच्या छायेत असल्याचं बोललं जातंय.
मात्र लोकसभा निवडणुकीत सहा हजारांची पिछाडी ही फार थोडकी असल्याचं सांगण्यात येत आहे. कारण हा एवढं मताधिक्य सुप्रिया शेवटच्या फेरीत पार करतील, असं जाणकारांकडून सांगितलं जात आहे.
मात्र सुप्रिया सुळे यांना पराभवाचा धक्का बसला तर हा राज्याच्या राजकारणातील एक इतिहास ठरणार आहे.