आष्टी तालुक्यात आज फेरमतदान

बीडमध्ये आष्टी तालुक्यातल्या आंधळेवाडीमध्ये आज फेरमतदान होतंय. या ठिकाणी मतदान केंद्र ताब्यात घेण्याचा प्रकार झाल्या होता.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 24, 2014, 09:34 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, बीड
बीडमध्ये आष्टी तालुक्यातल्या आंधळेवाडीमध्ये आज फेरमतदान होतंय. या ठिकाणी मतदान केंद्र ताब्यात घेण्याचा प्रकार झाल्या होता.
आंधळेवाडीमध्ये १७ एप्रिलला संध्याकाळी साडेपाच वाजता नगर आणि औरंगाबादमधल्या महाविद्यालयीन तरुणानी मतदान केंद्र ताब्यात घेत बोगस मतदान केले होते, हे सर्व कार्यकर्ते भाजप समर्थक होते. त्यांना अटक करून पोलिसांनी कारवाई केली.
या प्रकारानंतर जिल्हाधिका-यांनी आंधळेवाडीमध्ये फेरमतदान घेण्याबाबत परवानगी मागितली होती. त्यानुसार आज फेरमतदान होतंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.