पुण्यातून विश्वजित कदम, कलमाडींचा पत्ता कट

पुण्यातून विश्वजित कदम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसने लोकसभा उमेदवारांची आज तिसरी यादी जाहीर केली.

Updated: Mar 18, 2014, 08:36 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
पुण्यातून विश्वजित कदम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसने लोकसभा उमेदवारांची आज तिसरी यादी जाहीर केली. एकूण ५८ जणांच्या यादीत महाराष्ट्रातील ४ जणांचा समावेश आहे.
सुरेश कलमाडी यांच्या उमेदवारीला खो देण्यात आला आहे. कॉमन वेल्थ घोटाळा प्रकरण सुरेश कलमाडी यांना भोवल्याची चर्चा आहे.
पुण्यानंतर, लातूर, चंद्रपूर, पालघर, आणि उत्तर गोवाची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.
लातूरमधून दत्तात्रय बनसोडे यांना काँग्रेसची उमेदवारी देण्यात आलीय.चंद्रपूरमधून संजय देवतळे यांना तिकीट मिळालंय.
पालघरमधून राजेंद्र गावित यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. उत्तर गोवामधून रवि नाईक काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवणार आहेत.
दिल्लीतील चांदनी चौक लोकसभा मतदार संघातून कपिल सिब्बल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शीला दीक्षित यांचे सूपूत्र संदीप दीक्षित यांना पूर्व दिल्लीतून उमेदवारी देण्यात आली आहे. ईशान्य दिल्लीतून जयप्रकाश अग्रवाल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नवी दिल्लीतून अजय माकन यांना उमेदवारी घोषीत करण्यात आली आहे.
अरूणाचल - २
आसाम - १
बिहार - १
छत्तीसगड - २
दीव-दमण - १
दिल्ली - ५
गोवा - २
गुजरात - ८
हरियाणा - ३
हिमाचल - १
झारखंड - २
कर्नाटक - २
म. प्रदेश - ३
महाराष्ट्र - ४
ओडिशा - २
पंजाब - १
राजस्थान - १५
सिक्किम - १
उत्तर प्रदेश - १
प. बंगाल - १

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो
करा.