मोदींनी का लपवली `एका लग्नाची गोष्टी`?

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या पत्नीच्या नावाचा उल्लेख केला आहे.

Updated: Apr 10, 2014, 12:22 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, वडोदरा
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या पत्नीच्या नावाचा उल्लेख केला आहे.
प्रतिज्ञापत्रात मोदींनी आपण विवाहित असल्याचं सांगून, आपल्या पत्नीच्या नावाचा उल्लेख केल्याने सोशल नेटवर्किंगवर चर्चेचं वादळ आलं आहे.
मोदींनी प्रतिज्ञापत्रात आपल्या पत्नीचं नाव जसोदाबेन असल्याचं सांगितलं.
नरेंद्र मोदी हे ब्रह्मचारी आहेत, अशी प्रतिमा आणि ओळख त्यांची युवकांमध्ये होती. मात्र आपल्या वैवाहिक जीवनावर काहीही न बोलणाऱ्या मोदींनी, लेखी स्वरूपात आपण विवाहित असल्याचं स्पष्ट केलं आहे.
मात्र मोदींचं जर लग्न झालं होतं, तर मोदी एवढे दिवस गप्प का होते?, मोदींनी 2012 च्या विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरला तेव्हा याविषयी काहीही माहिती का दिली नाही?, मोदींनी निवडणूक आयोगापासून ही माहिती का लपवली?, मोदींचा उमेदवारी अर्ज यावरून रद्द का करण्यात येऊ नये?, असे सवाल नेटीझन्सकडून उपस्थित केले जात आहे.
नरेंद्र मोदी हे विवाहित आहेत, यावरून सोशल नेटवर्किंगवर चर्चेचं वादळ सुरू झालं आहे, मोदी विरोधी आणि मोदींचे पाठीराखे यांच्यात फेसबुक आणि ट्वीटरवर चांगलचं युद्ध रंगलंय. मोदी विरोधकांना ही चांगली संधी असल्याची चर्चा सोशल नेटवर्किंगवर आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.