राहुल गांधींचे वक्तव्य दु:खद, अपमानास्पद- अभिराम सिंह

राहुल गांधींकडे देशाचे भावी पंतप्रधान म्हणून पाहण्यात येतं. नेहरु गांधी घराण्याने या देशावर जवळपास चाळीस वर्षे राज्य केलं त्याचा वारसा राहुल गांधी पुढे चालवत आहेत. पण उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत त्यांनी मुंबई-महाराष्ट्रातील उत्तर भारतीयांबद्दल केलेलं वक्तव्य चूकीचे आहे. राहुल गांधींनी केलेले हे वक्तव्य हिंदी भाषिकांसाठी अपमानास्पद आहे पण त्यांनी हे जाणून बूजून केलं नसावं असं माझं मत आहे. तरीही त्यांनी केलेला शब्दप्रयोग अतिशय दुखद आहे.

Updated: Jun 20, 2012, 08:09 AM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

राहुल गांधींकडे देशाचे भावी पंतप्रधान म्हणून पाहण्यात येतं. नेहरु गांधी घराण्याने या देशावर जवळपास चाळीस वर्षे राज्य केलं त्याचा वारसा राहुल गांधी पुढे चालवत आहेत. पण उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत त्यांनी मुंबई-महाराष्ट्रातील उत्तर भारतीयांबद्दल केलेलं वक्तव्य चूकीचे आहे. राहुल गांधींनी केलेले हे वक्तव्य हिंदी भाषिकांसाठी अपमानास्पद आहे पण त्यांनी हे जाणून बूजून केलं नसावं असं माझं मत आहे. तरीही त्यांनी केलेला शब्दप्रयोग अतिशय दुखद आहे. राहुल गांधी वयाने तरुण आहेत आणि मायावतींच्या कुशासनाबद्दल असलेल्या संतापाच्या भरात त्यांनी हे वक्तव्य केलं असावं. राहुल गांधी शब्दाच्या वापरावर नियंत्रण ठेऊ शकले नाही.

उत्तर भारतीय जगाच्या अनेक देशांमध्य जाऊन स्थाईक झाले आहेत. मॉरेशिस, फिजी, वेस्ट इंडिज सारख्या देशांचे नेतृत्व उत्तर भारतीयांनी केलेलं आहे. उत्तर भारतीय स्वाभिमानी आहेत, कष्टाळू आहेत, नैतिकतेची जपणूक करणारे आहेत ते भिकारी कसे असू शकतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आणि मी वैयक्तिकही राहुल गांधींच्या वक्तव्याशी सहमत नाही. महाराष्ट्रातील मराठी बांधवांनी आजवर उत्तर भारतीयांना केंव्हाही अपमानास्पद वागणूक दिलेली नाही.

जयंत नारळीकरांचे वडिल हे बनारसच्या हिंदू विद्यापीठाचे विभाग प्रमुख होते. जयंत नारळीकरांसारख्या बुध्दीमान शास्त्रज्ञाने न्यूटनच्या सिध्दांताला आव्हान दिलं होतं. जयंत नारळीकर बनारस विद्यापीठचे विद्यार्थी होते. ते जन्माने उत्तर भारतीय आहेत. उत्तर भारतीयांनी आपल्या प्रतिभा सामर्थ्याने अनेकविध क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवला आहे. त्यामुळेच उत्तर भारतीयांबद्दल राहुल गांधींनी काढलेले उदगार खेदजनक आहेत. तरीही त्यांनी जाणून बूजून केलं असावं असं मला वाटत नाही.