डॉ . सुमेध,
ओआरएफ
आज काल MBBS डिग्रीला काही महत्त्वच नसल्यासारखे आहे. या डिग्रीवर न पैसे मिळत, न मान मिळत. डिग्री फ़क्त नावापुढे डॉक्टर लावण्यापुरती आहे. दुर्दैवाने हेच चित्र सगळीकडे दिसत आहे. कोणालाही MBBS झाल्यानंतर PG कशात करणार हाच प्रश्न विचारला जातो, कारण MBBS झालेला प्रत्येक विद्यार्थी PG करतो असा समजच होऊन बसला आहे. हे सोपे नाही हे माहित असताना देखील सर्व डॉक्टर्स मेंढरांसारखी या दरीत पडतात. पण यावर्षी मात्र हे PG ला जाणे आधीपेक्षा अनेक पटीने कठीण होऊन बसले आहे. जर एखाद्याने PG न करण्याचा विचार केला तर त्याला इतर लोक वेड्यात काढत, परंतु आज तोच डॉक्टर या इतरांवर हसेल अशी वेळ या NEET नावाच्या प्रवेश परीक्षेच्या निकालाने आणली आहे.
MBBS झाल्यानंतर सर्व PG Entrance च्या अभ्यासाला लागत. All India, MH CET, आणि इतर अनेक परीक्षा त्यांच्या डोळ्यासमोर असत. परंतु,या वर्षी Medical Council of India (MCI) ने अनेक वर्षांचा वाद निकालात काढला आणि एक सार्वत्रिक प्रवेश परीक्षा जाहीर केली- NEET अर्थात National Entrance cum Eligibility Test. या परीक्षेच्या स्वरूपाबद्दल आणि नियमांवर पुष्कळ वाद झाले परंतु शेवटी नोव्हेंबर-डिसेंबर 2012 मध्ये भारतभरात ही परीक्षा ऑनलाईन घेतली गेली. देशभरातून 95000 पेक्षा ही जास्त डॉक्टर ह्या परीक्षेला बसले होते. अवघड निकाल-पद्धतीमुळे MCI ने निकालाची तारीख उशिरा ठरवली आणि 31 जानेवारीला निकाल देण्याचे जाहीर केले. दुर्दैवाने आज एप्रिल अर्धा संपूनही MCI ची 31 जानेवारी उजाडतेच आहे. अर्थात यामध्ये MCI चा फार दोष नाही. पैसे उकळत राहण्याऱ्या खाजगी महाविद्यालयांच्या स्वायत्त आणि मनमानी प्रवेश प्रक्रियेवरच NEET ने गदा आणल्यामुळे त्यांना मिरच्या झोंबल्या. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल केला आहे. परिणामी, सर्वोच्च न्यायालय जोपर्यंत हा प्रश्न सोडवत नाही तोपर्यंत परीक्षेचा निकालही लागणार नाही.
जर या प्रश्नाच्या खोलात जायचे ठरवले तर याचे अनेक कंगोरे आपल्याला विचारांत घ्यावे लागातील. देशात सध्या एकूण 314 वैद्यकीय महाविद्यालये आहेत ज्यांपैकी तब्बल 165 खाजगी आहेत. यांमध्ये डीम्ड विद्यापीठांचाही समावेश होतो. आतापर्यंत All India PG Entrance आणि प्रत्येक राज्याची CET याव्यतिरिक्त या खाजगी महाविद्यालयांच्या संघटनेने दरवर्षी आपली एक वेगळी प्रवेश परीक्षा घेतली आहे. यातच भर म्हणून डीम्ड विद्यापीठे आपल्या स्वतःच्या वेगळ्या प्रवेश परीक्षा घेत. डोनेशन आणि गगनचुंबी फीस यांच्यावर ही महाविद्यालये चालत असल्याने निकाल शक्यतो श्रीमंतांच्या बाजूनेच लागत. NEET च्या रूपाने या बाजाराच्या अस्तित्वावरच वाचक बसल्याने या लोकांनी सर्वोच्च न्यायालयात खटला भरला. परीक्षा जाहीर झाल्यानंतर आणि परीक्षा होण्या आधीच हा खटला का भरला नाही हा महत्वाचा प्रश्न इथे उभा राहतो. असो, सर्व डॉक्टर निकालाची वाट बघत असताना ह्या खटल्यापायी न्यायालयाने निकाल थांबवला आहे.
PG ला प्रवेश मिळवण्यासाठी डॉक्टर दोन दोन तीन तीन वर्षे अभ्यास करून या परीक्षेसाठी तयार होतात. दरवर्षीची अनिश्चितता, डॉक्टरकीची डिग्री असतानाही बेकारी आणि आता न संपणारी प्रतिक्षा… या डॉक्टरांनी करायचे काय? निकाल लागल्यावरही प्रवेश मिळण्याची शाश्वती तर नसतेच, त्यामुळे पुढल्या वर्षीसाठी अभ्यास करायचाच आहे… परंतु सतत च्या या बदलांच्या पार्श्वभूमीवर कुठल्या pattern ला डोळ्यासमोर ठेऊन अभ्यास करायचा, क्लासेस कुठले लावायचे हे प्रश्न भेडसावत आहेतच.
याच वर्षीचा फक्त विचार केला तर एकाच परीक्षा झालेली असल्याने याच परीक्षेवर आधारित प्रवेश होणार हे उघड आहे (इतर परीक्षा घेतल्याच गेल्या नसल्याने दुसरा पर्याय ही नाही). खटला चालायचा असेल तर चालू देत, पण त्याच्या निकालाची अंमलबजावणी पुढल्या वर्षीपासून व्हावी हेच व्यावहारिक आहे… या वर्षी सर्व डॉक्टरांचे भविष्य का टांगत ठेवावे? प्रत्येक वर्षीच्या प्रवेश प्रक्रियेत ३ राउंड होतात आणि ही प्रक्रिया ३१ मे पर्यंत संपते जेणेकरून जून पासून महाविद्यालयीन वर्ष सुरु होते. एप्रिल उजाडल्यानंतरही न्यायालयाच्या तारखांवर तारखा पडत राहिल्या, तेव्हा केंद्रीय आरोग्य व कुतुम्बाकाल्यान मंत्री श्री गुलाम नबी आझाद यांनी न्यायालयास ३१ मे च्या याच कारणावर निकाल जाहीर करू देण्याची विनंती केली. परंतु, ४ एप्रिल च्या दिवशी न्यायालयाने एक वेगळीच भूमिका याबद्दल घेतली आणि डॉक्टरांन