www.24taas.com, नवी दिल्ली
हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसच्या विजयाच्या घोषणेनंतर मुख्यमंत्री कोण असेल, या प्रश्नावर काँग्रेसचे महासचिव बीरेंद्र सिंग यांनी सोनिया गांधींकडे बोट दाखवलंय.
काँग्रेसचे महासचिव बीरेंद्र सिंग यांनी हिमाचल प्रदेशमध्ये मुख्यमंत्र्यांची निवड पक्षाध्यक्ष सोनिया गांधीच करतील, असं स्पष्ट केलंय.
‘काँग्रेसची सत्ता आली तर लोकभावना स्पष्ट आहे की कोणाला मुख्यमंत्री करणार’ असं म्हणत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वीरभद्र सिंह यांनी मुख्यमंत्रिपदाची दावेदारी सादर केली होती. याच पार्श्वभूमीवर बीरेंद्र सिंग यांनी ही प्रतिक्रिया दिलीय. पाच वेळा हिमाचल राज्याचे मुख्यमंत्री बनलेल्या वीरभद्र यांनी काँग्रेसच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. पण, सध्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करणाऱ्या वीरभद्र यांचे डोळे मुख्यमंत्रिपदाकडे लागले आहेत, हे स्पष्ट आहे.