मुंबई : वातावरण सतत बदलत राहिल्याने सर्दी आणि खोकला याचा त्रास हा अधिक होत असतो. बदलत्या वातावरणाचा आरोग्यावर अधिक परिणाम होतो. त्यामध्ये सर्दी आणि खोकला याची समस्या अनेकांना असते. तर अशा वेळेस काही घरगुती उपाय करून तुम्ही यावर उपचार करू शकता.
१. सर्दीमुळे श्वास घेतांना त्रास होत असेल तर दालचीनी, काळी मिरी, विलायची आणि जिरे याची पावडर करून एका सुती कपड्यात बांधा आणि नाकासमोर धरुन त्याचा वास घ्या. यामुळे तुम्हाला शिंक येऊन कोंडलेला श्वासोच्छवास सुरळीत होईल.
२. लसणाच्या २-३ कुडी १ कप दुधात टाकून उकळवा. हे दूध थंड झाल्यानंतर संध्याकाळी झोपण्याच्या आधी घ्या. यामुळे तुम्हाला आराम मिळेल.
३. मधाबरोबर आलं खाल्याने बराच आराम मिळतो. सकाळ-संध्याकाळ केल्याने याचा चांगला फायदा होतो.
३. ग्लासभर गरम पाण्यात थोडं मीठ, सोडा घालून दिवसातून दोन वेळा झोपण्याच्या आधी गुळण्या केल्यास घशाला आराम मिळतो.
४. तुळशीचे पाने चाऊन खाल्याने किंवा पाण्यामध्ये उखळून त्याचा काढा बनवून प्यायल्याने फायदा होतो.