'थायरॉइड'बद्दल या ८ महत्त्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहिती हव्या!

जर आपलं वजन काही दिवसांमध्ये खूप झपट्यानं वाढत किंवा कमी होत असेल, आपलं कामात मन लागत नसेल आणि नाराज वाटत असेल तर हे सर्व लक्षणं थायरॉइड डिसऑर्डरचे असू शकतात. थायरॉइडची समस्या पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त पाहायला मिळते. यामुळं शरीरात काही चेंजेस सहजपणे निदर्शनास येतात. 

Updated: Aug 27, 2015, 09:28 PM IST
'थायरॉइड'बद्दल या ८ महत्त्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहिती हव्या! title=

मुंबई: जर आपलं वजन काही दिवसांमध्ये खूप झपट्यानं वाढत किंवा कमी होत असेल, आपलं कामात मन लागत नसेल आणि नाराज वाटत असेल तर हे सर्व लक्षणं थायरॉइड डिसऑर्डरचे असू शकतात. थायरॉइडची समस्या पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त पाहायला मिळते. यामुळं शरीरात काही चेंजेस सहजपणे निदर्शनास येतात. 

आणखी वाचा - वंध्यत्व आणि मुरूम येण्याचं हे कारण तुम्हाला माहितीय!

थॉयराइडबद्दल अनेक गैरसमजही आहेत. थॉयराइडची समस्या गळ्यात असलेल्या थायरॉइड ग्रंथी आणि त्यातून स्त्रावित होणाऱ्या हार्मोन्सवर अवलंबून आहेत. जाणून घ्या 'थायरॉइड'बद्दल या ८ महत्त्वाच्या गोष्टी 

१. थायरॉइड एक असा आजार आहे ज्यामुळं रुग्ण इतर आजारांनीही ग्रस्त होऊ शकतो. यासाठी मेडिकल टेस्ट आणि उपचारासह विशिष्ट कोर्स पूर्ण करायला हवा.

२. हा आजार आपल्या हाडांवरही परिणाम करतो. म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्यानं व्हिटॅमिन सप्लीमेंट आणि कॅल्शियमचा वापर करणं गरजेचं असतं.

३. थायरॉइडची समस्या स्त्रियांच्या मासिक पाळीवरही परिणाम करते. सोबतच कोलेस्ट्रॉल वाढून आपल्याला हृदयाचे आजारही होऊ शकतात. 

४. हा आजार ३० वर्षांनंतर महिलांमध्ये जास्त प्रमाणात होण्याची शक्यता असते. काही प्रकरणांमध्ये यापेक्षा कमी वयाच्या स्त्रियांनाही या समस्येचा सामना करावा लागतो. ६०च्या वयापर्यंत प्रत्येक पाच पैकी एका महिलेला थायरॉइडची समस्या असते.

५. लहान वयात थायरॉइड झाल्यास मासिक पाळी अनियमित येते. तर कधी रक्तस्त्राव थांबतो आणि गरोदरपणाची क्षमताही कमी होते. 

६. हायपर थायरॉइडच्या रुग्णांना उन्हाळ्यात खूप जास्त गरम होतं आणि त्यांचं मेटॅबॉलिझम वाढतं. हेच कारण आहे त्यांना घाम खूप जास्त येतो. तर हायपो-थायरॉइडमध्ये रुग्णांना हिवाळ्यात खूप जास्त थंडी वाजते आणि त्यांचं जेवण कमी होतं.

७. काही रुग्णांना आर्थरायटिसमध्ये उपचार करतांना फायदा होत नाही, जे टीएसएचचं प्रमाण वाढण्यासाठी कारण असतं. अशात थायरॉइडवर उपचार केल्यानं आर्थरायटिसमध्येही आराम मिळतो.

८. डॉक्टर्स थायरॉइडच्या रुग्णांना दररोज काही वेळ उन्हात बसण्याचा सल्ला देतात. शिवाय आयोडिन, हिरव्या भाज्या, लसूण, तीळ, मशरूम खाणं पण थायरॉइडच्या रुग्णांसाठी फायदशीर ठरतात. 

आणखी वाचा - गळणाऱ्या केसांसाठी काही घरगुती उपाय

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.