केवळ २५ मिनिटं फिरून आपल्या वयात सात वर्ष जोडायला

दररोज २५ मिनिटं वॉकिंग केल्याने तुमच्या आयुष्यात सात वर्ष वाढू शकतात असे मत आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. तसेच थोडासा व्यायाम करून तुम्ही हार्ट अॅटकची शक्यता कमी करू शकतात. 

Updated: Aug 31, 2015, 07:26 PM IST
केवळ २५ मिनिटं फिरून आपल्या वयात सात वर्ष जोडायला title=

मुंबई : दररोज २५ मिनिटं वॉकिंग केल्याने तुमच्या आयुष्यात सात वर्ष वाढू शकतात असे मत आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. तसेच थोडासा व्यायाम करून तुम्ही हार्ट अॅटकची शक्यता कमी करू शकतात. 

६९ व्यक्तींवर संशोधन 
युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजीमध्ये सादर करण्यात आलेल्या अभ्यासानुसार रोज व्यायाम केल्याने तुमचे वाय वाढते. जर्मनीच्या सारलँड विद्यापीठात ३० ते ६० वयोगटातील ६९ व्यक्तींवर संशोधन करण्यात आले. जे दररोज व्यायाम करत नव्हते. 

अधिक वाचा : 'सुपर हॉट सनी मॉर्निग' | सनी दाखवणार व्यायाम प्रकार

जगले ९० वर्षांपर्यंत 
वृध्दावस्था आपण रोखू शकत नाही. पण रोज व्यायाम केल्याने वय वाढण्याची प्रक्रिया कमी होते. अशाने ७०व्या वर्षीही लोक तरूण दिसू शकतात आणि ९० वर्षांपर्यंत जगू शकतात. 

फिरा फक्त २० मिनिटं
या संशोधनानुसार सर्वांना केवळ २० ते २५ मिनिट फिरणं किंवा वॉकिंग आणि खाण्यापिण्यात चांगले बदल केले पाहिजे.  व्यायाम केल्याने बुद्धीही तल्लख होते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.