अॅसिडीटीची कारणं आणि लक्षणं

चयापचय एक रासायनिक प्रक्रिया आहे. ज्यात आपण खाल्लेले अन्न आणि पेयपदार्थांचे उर्जेत रूपांतर केले जाते. या प्रक्रियेत अन्नातील ऊर्जा, प्रोटीन आणि फॅटमध्ये रूपांतरित होते. 

Updated: Sep 16, 2015, 05:51 PM IST
अॅसिडीटीची कारणं आणि लक्षणं title=

मुंबई : चयापचय एक रासायनिक प्रक्रिया आहे. ज्यात आपण खाल्लेले अन्न आणि पेयपदार्थांचे उर्जेत रूपांतर केले जाते. या प्रक्रियेत अन्नातील ऊर्जा, प्रोटीन आणि फॅटमध्ये रूपांतरित होते. 

शरीरात ही प्रक्रिया सातत्याने सुरू असते. यातून शरीराला ऊर्जा मिळत राहते आणि शरीरात पेशी तयार होण्यास मदत मिळते. शरीरातील विषारी घटकांचेदेखील नियंत्रण केले जाते.

आपल्या शरीराची सर्वात महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे चयापचय. आपल्याला बोलणे, चालणे एवढेच नव्हे तर खाण्यासाठी ज्या उर्जेची गरज असे ती चयापचय मधून मिळते. चयापचयला इंग्रजी मेटाबोलिझ्म म्हणतात.

मात्र जेव्हा शरीरातील चयापचयाच्या क्रियेत काही काळाने अडथळ निर्माण होतो, तेव्हा अॅसिडीटी सारखे प्रकार सुरू होतात. 

अॅसिडीटीची कारण खालील असू शकतात
1) तणाव
2) तिखट, मसालेदार, तेलकट आणि सतत नॉन व्हेजचा मारा
3) धुम्रपान आणि अल्कोहोल
4) पोटातील गाठ, अल्सर आणि इतर आजार

अॅसिडीटीची लक्षणं
1) पोटात जळजळ होणे
2) घशात जळजळणे
3) ढेकर देणे
4) मळमळणे
5) आंबट चव
6) अपचन

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.