मध खा पण अशा पद्धतीनं बिलकूल नाही!

मध आपल्या आरोग्यासाठी लाभदायक ठरतो... खायलाही गोड लागतो... म्हणून तुम्हाला तो खायलाही आवडतो... नाही का! पण, हा मध कोणत्या पद्धतीनं खाल्ला म्हणजे त्याचा शरीराला जास्तीत जास्त फायदा मिळतो हेदेखील तुम्हाला माहीत असायला हवं... 

Updated: Sep 16, 2015, 03:54 PM IST
मध खा पण अशा पद्धतीनं बिलकूल नाही! title=

मुंबई : मध आपल्या आरोग्यासाठी लाभदायक ठरतो... खायलाही गोड लागतो... म्हणून तुम्हाला तो खायलाही आवडतो... नाही का! पण, हा मध कोणत्या पद्धतीनं खाल्ला म्हणजे त्याचा शरीराला जास्तीत जास्त फायदा मिळतो हेदेखील तुम्हाला माहीत असायला हवं... 

अधिक वाचा - नारळ पाणी पिण्याचे पाच फायदे

पण, हाच मध चुकीच्या पद्धतीनं म्हणजेच चुकीच्या गोष्टींसोबत खाण्यात आला तर त्याचे वाईट परिणामही तुमच्या शरीराला भोगावे लागू शकतात. जाणून घेऊयात अशाच काही पद्धती ज्या मध खाताना कधीच वापरू नयेत.

अधिक वाचा - सर्दी-खोकला बरा करण्यासाठी पाच घरगुती उपाय!

- चहा किंवा कॉफी बनवताना साखरेच्या जागी, गोड लागतो म्हणून मध तुम्ही त्यात मिसळत असाल तर थांबा... असं कधीच करू नका कारण हा प्रकार तुमच्या शरीरासाठी घातक ठरू शकतो. 

- मध कधीही आगेवर ठेऊन भाजण्याचा प्रयत्न करू नका. यामुळे तुम्ही आजारी पडू शकता.

- तेल किंवा तुपासोबत मध कधीही मिसळून खाऊ नका

- मटन किंवा माशांसोबत मध कधीही खाऊ नका... हे तुमच्या जीवासाठी धोकादायक ठरू शकतं.

- साखरेत मध कधीही मिसळून खाऊ नका... विषापेक्षा हे कमी नाही.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.