मुंबई : पाठदुखी का होते? असा प्रश्न आपल्याला अनेक वेळा पडतो, पाठदुखीची अनेक कारणं असली तरी काही सामान्य कारणं देखिल आहेत. पाठदुखी म्हणजे खालच्या बाजूला पाठ दुखणे, पाठीवर ताण येणे किंवा बसतांना अस्वस्थ वाटणे.
पाठदुखीमुळे अनेक वेळा पाठीचा कणा आणि स्नायू दुखावतात. पाठदुखी होण्यात मानसिक ताणाचाही समावेश असू शकतो, ही महत्वाची बाब जाणून घेणे अत्यंत महत्वाचे आहे.
अनेक वेळा असंही होतं, पाठीच्या कण्याजवळ काही मोठे स्नायू असतात, या स्नायुंचा कण्याला आधार असतो, हे दुखावल्यामुळेही पाठदुखी सुरू होते, आणि बऱ्याच वेळा पाठीला दुखापत झाली नसेल, आणि पाठ दुखत नसेल, तर ही स्थिती मानसिक स्थितीमुळे निर्माण होते.
पाठदुखीची आणि ताणाची कारणे
ताणामुळे आलेली पाठदुखी ही एकाच जागी, एकाच पोझ मध्ये खूप वेळ बसल्यामुळे किंवा ताण आल्यामुळे येते. जसे की नोकरीच्या ठिकाणी खुर्चीत दिवसभर बसावे लागते. पाठीवरच्या ताणामुळे माणसाचा मानसिक ताण सुद्धा वाढण्याची शक्यता असते. आणि बऱ्याचदा मानसिक ताणामुळे पाठदुखी सुरू होते.
सर्वसाधारणपणे आढळणारी खालच्या बाजूची पाठदुखी ही २० ते ४० या वयोगटात आढळते. हे दुखणे पाठ, खालची बाजू किंवा मांड्या ह्या ठिकाणी होते. अशा प्रकारचे दुखणे बरे व्हायला ४ ते ५ आठवडे लागतात. अशा ठिकाणी जखम झाली तर त्यावरचा अतीताण जायला १२ ते ३६ तास लागतात.
अशी काहीवेळा गंभीर स्थिती असते जेव्हा पाठदुखी मानसिक ताणामुळे नसते, पूर्णपणे शारिरीक असते आणि भयंकर वेदना देणारी असते; तेव्हा मात्र ताबडतोब डॉक्टरांकडे जाणे आणि गरज लागल्यास हॉस्पिटलमधे ऍडमिट होणे जरुरीचे असते.
उदाहरणार्थ, एखाद्या रस्ते अपघातात मार बसल्याने पाठीची वेदना होते, मार बसतो तेव्हा तात्काळ मदत लागते. तसेच अतीताण घेऊन खूपच जास्त वजन उचलले तरीही पाठीला फ़्रॅक्चर होऊ शकते आणि त्याचे नंतर रुपांतर पाठदुखीत होते.
पाठीमध्ये गाठ झाली, ट्युमर झाला, किंवा कसला संसर्ग झाला तरीही पाठदुखी ही असतेच. कर्करोग, ताप, संसर्ग, वजन उतरणे, अशक्तपणा ह्या सर्व समस्यांमुळे होणा-या पाठदुखी बद्दल आपण आपल्या डॉक्टरांना किंवा फिजिशियनना सांगणे अत्यंत गरजेचे असते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.