तिळाच्या तेलाचे हे आहेत ५ फायदे

केवळ खाण्यातच नव्हे तर केसांसाठी तसेच त्वचेसाठी तिळाचे तेल अतिशय उपयोगी आहे. 

Updated: Feb 7, 2016, 10:04 AM IST
तिळाच्या तेलाचे हे आहेत ५ फायदे title=

मुंबई : तिळाच्या तेलाचा जेवणात वापर केल्याने जेवण स्वादिष्ट होते. मात्र याचा केवळ खाण्यातच नव्हे तर केसांसाठी तसेच त्वचेसाठी तिळाचे तेल अतिशय उपयोगी आहे. या तेलात व्हिटामिन ई, बी कॉम्प्लेक्स, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि फॉस्फरससाखी खनिजे तसेच प्रोटीनची चांगली मात्रा असते. यासाठीच हे केस तसेच त्वचेसाठी फायदेशीर असते. 

केंसाच्या वाढीसाठी फायदेशीर आहे तिळाचे तेल. तिळाच्या तेलाने स्काल्पला मसाज केल्यास रक्तप्रवाह सुधारतो. यामुळे लांबसडक केस होतात. यासाठी केवळ आठवड्यातून एकदा तिळाच्या तेलाने स्काल्पला मसाज करा. केस नक्की वाढतील.

केमिकल्स, प्रदूषण आणि उन्हामुळे तुमचे केस खराब झाले असतील तिळाच्या तेलाचा वापर उत्तम. तिळाचे तेल खोलवर जाऊन केसांना पोषण देते. 

सूर्यांच्या किरणांमधून निघाणारे यूव्ही रेंज त्वचा आणि केसांना नुकसान पोहोचवतात. तुम्ही तिळाच्या तेलाचा वापर करुन हे रोखू शकता. तिळाचे तेल केस आणि त्वचेवर संरक्षक कवच बनवते ज्यामुळे केस अथवा त्वचेचे नुकसान होत नाही. 

हल्ली कोंड्याची समस्या सर्वसामान्य झालीये. झोपण्यापूर्वी बोटांच्या सहाय्याने तिळाचे तेल स्काल्पला लावून मसाज करा आणि सकाळी केस धुवा. कोड्यांची समस्या निघून जाईल. 

कोरडे तसेच रुक्ष केसांमध्ये नवजीवन आणण्याचे काम तिळाचे तेल करते. आठवड्यातून एकदा तिळाच्या तेलाचा वापर केल्यास स्पिल्ट एंड्स तसेच कुरळे कोरड्या केसांची समस्या दूर होईल.