मुंबई : चेहरा खराब होण्यामागे अनेक कारणं असू शकता. प्रदूषण, केमिक्लस यामुळे त्वचा खराब होते. यामुळे चेहरा काळा पडणे, पिंपल्स येणे, अशा अनेक समस्या उद्भवतात.
सुंदर दिसण्यासाठी अनेक जण पार्लमध्ये खर्च करतात पण काही घरगुती उपाय करुनही तुम्ही चेहरा उजळवू शकता.
सुंदर दिसण्यासाठी 5 टिप्स
१. ४ चमचे दहीमध्ये एक चमचा कोको पावडर आणि मध एकत्र करून हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. २० मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुतल्यास चेहरा उजळतो.
२. लिंबाच्या साली सुकुवून वाटून घ्याव्यात. त्या पावडरमध्ये थोडे दूध आणि हळद मिसळून रोज चेहऱ्याला लावले तर त्वचा उजळते.
३. बटाटे किसल्यावर खाली पाण्यात जो पांढरा भाग उरतो तो जर चेहरा आणि मानेला नियमित लावला तर त्वचा उजळते.
४. टोमॅटो आणि काकडी नियमित चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्याला चमक येते.
५. अंड्याचा बलक आणि एक चमचा नारळाचे पाणी एकत्र करुन त्यामध्ये ओटमील घालून याची पेस्ट चेहऱ्यावर आणि काळ्या डागावर लावा. १५ मिनिटांनी कोमट पाण्याने चेहरा धुतल्यानंतर डाग कमी होण्यास मदत होते.