मुंबई :जर तुम्हाला थकवा जाणवत असेल आणि आरामाची गरज असेल तर झोपण्याआधी जरुर दालचिनी पूड घातलेले दूध घ्या. रात्री गरम दूध पिण्याने झोप चांगली लागते. मात्र त्यात दालचिनी पूड घातल्यास या दुधाचे फायदे अधिक वाढतात.
चांगल्या झोपेसाठी - तुम्हाला चांगली झोप हवी असल्यास रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दालचिनी पूड घातलेले दूध नक्की प्या. यामुळे तुम्हाला चांगली झोप येईल.
मजबूत हाडांसाठी - दालचिनीची पूड टाकलेल्या दुधात मध टाकून प्यायल्यास हाडे मजबूत होण्यास मदत होते. याच्या नियमित सेवनाने हाडे ठिसूळ होत नाहीत.
प्रतिकारक्षमता वाढते - दालचिनीच्या दुधाने शरीरातील प्रतिकारकक्षमता वाढते. आधीच्या काळात लहान मुलांना असे दूध दिले जात असे यामुळे लहान मुलांची रोगप्रतिकारक्षमता वाढते.
योग्य पचनासाठी - पचनाचा त्रास असल्यास दालचिनीची पूड टाकलेले दूध प्यायल्याने फायदा होतो. तसेच गॅसचा त्रासही जाणवत असल्यास तो दूर होतो.
चांगल्या त्वचेसाठी तसेच केसांसाठी - दालचिनीची पूड घातलेले दूध प्यायल्याने केस आणि त्वचेसंबंधित सर्व समस्या दूर होतात.