रोज एक वाटी दहीभाताचे सेवन करणे फायदेशीर

हल्लीच्या धावपळीच्या लाईफस्टाईलमध्ये आरोग्याच्या समस्यांचे प्रमाण वाढू लागलेत. याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या आरोग्याकडे लक्ष न दिले जाणे. अनेकदा बाहेरच्या खाण्यामुळे तसेच वेळेत न खाल्ल्यास पोटाच्या समस्या उद्भवतात. यावेळी यावर उपाय म्हणून एक वाटी दही आणि भात खाल्ल्यास फायदा होतो. 

Updated: Jul 29, 2016, 09:56 AM IST
रोज एक वाटी दहीभाताचे सेवन करणे फायदेशीर title=

मुंबई : हल्लीच्या धावपळीच्या लाईफस्टाईलमध्ये आरोग्याच्या समस्यांचे प्रमाण वाढू लागलेत. याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या आरोग्याकडे लक्ष न दिले जाणे. अनेकदा बाहेरच्या खाण्यामुळे तसेच वेळेत न खाल्ल्यास पोटाच्या समस्या उद्भवतात. यावेळी यावर उपाय म्हणून एक वाटी दही आणि भात खाल्ल्यास फायदा होतो. 

असा बनवा दहीभात

एका वाटीत भात घ्या. त्यात दही मिसळा. एका पॅनमध्ये थोडे तेल टाकून त्यात जिरे आणि उडिद डाळ टाका. त्यानंतर ४-५ कढीपत्त्याची पाने, कोथिंबीर आणि मीठ टाका. यात दही आणि भात टाकून चांगले ढवळा. 

दही आणि भात एकत्रित खाल्ल्यास केवळ पोटाच्या समस्या दूर होत नाहीत तर अनेक आजारांमध्ये फायदा होतो.

 लठ्ठपणा होतो कमी - भात खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो. मात्र दही आणि भात खाल्ल्याने लठ्ठपणा वाढत नाही. 

ताप आल्यास - ताप आल्यास तोंडाला चव नसते. काही खाण्याची इच्छा होत नाही. यावेळी ताप आलेल्या व्यक्तीस दहीभात खाण्यास द्यावा. दह्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. 

पोटात गडबड असल्यास - वेळी-अवेळी खाणे, तसेच बाहेरच्या खाण्यामुळे पोटात गडबड झाल्यास दहीभात खाणे उत्तम.