लग्नापूर्वी सेक्स करण्याचे ५ दुष्परिणाम

लग्नापूर्वी सेक्स केल्याने पाच प्रकारचे दुष्परिणामांना समाेरे जावे लागते. 

Updated: Dec 22, 2015, 09:30 PM IST
 लग्नापूर्वी सेक्स करण्याचे ५ दुष्परिणाम  title=

 नवी दिल्ली :  एक काळ असा होता जेव्हा पुरूष आपल्या पत्नीला विवाह करून घरी आणल्यानंतर तिचा चेहरा पाहत असे. आता तो काळ निघून गेला आहे. 
 
 या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जमान्यात नव्या परिभाषेत संबंधातील अंतर कमी झाले आहे. नव्या युगात लोकांच्या विचार सरणीत खूप बदल झाला आहे. युवकांना कोणत्याही बंधनात त्यांच्या मर्जीशिवाय बांधणे सोपे राहिले नाही. विवाहपूर्वी सेक्स संबंध बनिविणे किंवा लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणे यावर आता युवकांना विचार करण्याची गरज वाटत नाही. 
 
 जगभरात करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार कमी वयातील तरूण-तरूणी सेक्स करण्यात पुढे आहेत. त्यांना फरक पडत नाही. कोणत्या परिस्थितीत सेक्स संबंध निर्माण होऊ शकतात, त्याचे दुष्परिणाम... 
 
 १) डेट करत असताना -
डेट करत असताना तरूण-तरूणी लग्नापूर्वी संबंध प्रस्थापित करतात. डेट म्हणजे एकमेकांना समजून घेणे आणि त्यानंतर लग्न करणे असा असतो. पण इथे होतं वेगळं एकमेकांना समजून घेण्याऐवजी ते सेक्स करतात आणि त्यांना डेटचा अर्थ तोच वाटतो. पण सावधान असुरक्षित सेक्स केल्याने एचआयव्ही/एड्स होण्याचा धोका अधिक असतो. 
 
 २) अविश्वास - तुम्ही स्वतः लग्नापूर्वी कोणाशी सेक्स संबंध प्रस्थापित केले असतील तर त्यामुळे लग्नानंतर तुम्ही ज्या व्यक्तीसोबत आयुष्य घालविणार आहे. त्याबद्दल अविश्वास निर्माण होतो. त्यानेही सेक्स केला असेल असा समज होतो. त्यातून तणाव आणि एकमेकांप्रति सन्मान कमी होतो. 
 
 ३) लिव्ह इन रिलेशनशीप - आज काल भारतातही लिव इन रिलेशनशीप खूप सामान्य झाली आहे. विशेषतः मोठ्या शहरांमध्ये हा प्रकार वाढत चालला आहे. या प्रकारात तरूण-तरूण एकमेकांसोबत सेक्स संबंध निर्माण करतात. पण एखाद्या कारणाने नाते संपुष्टात आल्यावर मानसिक आघात पोहचतो. 
 
 ४) तरूणींसाठी तणावपूर्ण - लग्नापूर्वी सेक्स संबंध निर्माण करणे हे तरूणींसाठी अधिक मानसिक तणाव निर्माण करणारे असते. लग्नापूर्वी सावधानता न बाळगता सेक्स केल्यास नको असलले गर्भारपण लादले जाऊ शकते. 
 
 ५) एड्सचा धोका -  लग्नापूर्वी सेक्स करणे खूप महागात पडू शकते. हा सेक्स सुरक्षित असेलच असे नाही. एखाद्या एचआयव्ही / एड्सग्रस्त व्यक्तीशी संबंध निर्माण झाल्यास तुम्हालाही तो आजार होऊ शकतो.