तुमच्या शरीराबाबतच्या या ७ गोष्टी तुम्हाला माहित आहे का ?

आपलं शरीर हे एका मशीनप्रमाणे काम करतं. ही गोष्ट आपण शाळेत ही शिकलो आहे. पण अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला आजही माहित नसतील. जाणून घ्या आपल्या शरिराबाबतच्या काही महत्त्वाच्या गोष्टी.

Updated: Apr 19, 2016, 03:07 PM IST
तुमच्या शरीराबाबतच्या या ७ गोष्टी तुम्हाला माहित आहे का ? title=

मुंबई : आपलं शरीर हे एका मशीनप्रमाणे काम करतं. ही गोष्ट आपण शाळेत ही शिकलो आहे. पण अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला आजही माहित नसतील. जाणून घ्या आपल्या शरिराबाबतच्या काही महत्त्वाच्या गोष्टी.

१. आपलं नाक हे कोणताही गंध प्राण्यांच्या नाकाप्रमाणे अधिक प्रकारे जाणून नाही घेऊ शकत. जसं प्राण्याचं नाक हे अधिक मोठ्या प्रमाणात कोणताही गंध ओळखू शकतात. पण माणसाचं नाक हे ५०००० वेगवेगळे गंध घेऊ शकतात.
 
२. कोणत्याही व्यक्तीच्या घामाला वास नसतो. वास हा घामामधल्या बॅक्टेरियामुळे येतो.

३. तुमच्या तोंडात जेवढे बॅक्टेरिया आहेत ते या जगात राहणाऱ्या लोकांच्या संख्येपेक्षा अधिक आहे. 

४. माणसाचं नाक आणि कान हे आयुष्यभर वाढतं. पण त्याचं वाढण्याचं प्रमाण खूपच कमी असते.

५. मधल्या बोटाचं नख हे इतर बोटांच्या नखापेक्षा अधिक प्रमाणात वाढतं.

६. आपल्या शरिरातील १० टक्के लीवर हा फॅटचा बनलेला असतो.

७. मेंदूनंतर डोळे हे माणसाच्या शरिराचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे.