व्यायाम करतांना या ५ चुकांमुळे होऊ शकते त्वचेची समस्या

सुदृढ शरीर प्रकृतीसाठी आणि निरोगी जीवनशैलीसाठी व्यायाम करणे आवश्यक आहे. व्यायाम केल्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहतो. तुमची त्वचा देखील चमकदार होते. मात्र व्यायाम करताना या पाच चुका तुम्हाला त्रासदायक ठरु शकतात. जर तुम्ही नियमित व्यायाम करीत असाल तर या चुका करणे टाळा.

Updated: Nov 27, 2016, 03:52 PM IST
व्यायाम करतांना या ५ चुकांमुळे होऊ शकते त्वचेची समस्या title=

मुंबई : सुदृढ शरीर प्रकृतीसाठी आणि निरोगी जीवनशैलीसाठी व्यायाम करणे आवश्यक आहे. व्यायाम केल्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहतो. तुमची त्वचा देखील चमकदार होते. मात्र व्यायाम करताना या पाच चुका तुम्हाला त्रासदायक ठरु शकतात. जर तुम्ही नियमित व्यायाम करीत असाल तर या चुका करणे टाळा.

१. फाऊंडेशन वापरणे

व्यायाम करताना जाडसर व तेलकट फांऊडेशन वापरणे चुकीचे ठरु शकते. फांऊडेशनमुळे त्वचेखालील तैलग्रंथी बंद होतात आणि घाम येणे कमी होते. यामुळे तुमच्या त्वचेवर पुरळ येणे किंवा ब्रेकआऊट्स सारख्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.

२. एन्टीपर्सप्रन्ट रोल ऑन वापरणे

व्यायामापुर्वी कधीही डिओड्रन्ट अथवा अँन्टीपर्सप्रन्ट रोल ऑन वापरु नका. त्यामुळे तुमच्या त्वचेखालील छिद्रे बंद होतात. सहाजिकच त्यामुळे घामाद्वारे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडण्यास अडथळा येतो. अँन्टीपर्सप्रन्ट रोल ऑन मध्ये असणा-या अल्युमिनियम या घटकामुळे आरोग्याबाबत इतर शारीरिक समस्या देखील निर्माण होतात.

३. केस घट्ट बांधणे

जेव्हा तुम्ही केसांचा घट्ट बन बांधता तेव्हा तुम्हाला व्यायाम करताना आडवे झोपण्यास त्रास होतो. यासाठी व्यायाम करताना केसांची साधी वेणी घाला अथवा ते सैल बांधा.

४. केस मोकळे ठेवणे

ब्रेकआऊट्स येणे ही जीम एक्सरसाईजमध्ये त्वचेच्या बाबतीत होणारी एक प्रमुख समस्या आहे. व्यायाम करताना तुमचे केस तुमच्या चेह-यावर येणार नाहीत याची विशेष काळजी घ्या. कारण त्यामुळे व्यायाम करताना केसातील जंतू नकळत तुमच्या चेह-याच्या त्वचेवर पडत असतात. यासाठी व्यायाम करताना हेअरबॅन्डचा वापर करा. तसेच व्यायाम करण्यापुर्वी केसांमध्ये असे कोणतेही केसांचे सौदर्यप्रसाधन वापरू नका जे घामामुळे ओघळून तुमच्या चेह-यावर येतील.

५. व्यायाम करताना चेह-याला हात लावणे

व्यायाम करताना विशेषत: कार्डियो मशिन किंवा वेट्स करताना चेह-याला स्पर्श करणे टाळा. व्यायामासाठी वापरत असलेल्या मशिन्सवर जंतू असू शकतात त्यामुळे कृपया तुमचे हात चेह-याला स्पर्श करणार नाहीत याची विशेष दक्षता घ्या.