मुंबई : डोकंदुखी हा काही फारसा नवीन आजार नाही... दिवसातली धावपळ करता - करता तुम्हालाही कधीतरी डोकंदुखीचा त्रास जाणवला असेल. या डोकंदुखीची कारणं मात्र वेगवेगळी असू शकतात.
साधारणत: उच्च किंवा कमी रक्तदाब, मायग्रेन, डोळ्यांची जळजळ, आवाज, थंडी अशी यामागची कारणं असू शकतात. या डोकेदुखीची मुख्यत: चार प्रकार असू शकतात.
सायनस - डोळ्यांच्या वर आणि डोळ्यांच्या खालचा भाग दुखत असेल तर हा सायनसचा प्रकार समजला जातो.
ताण-तणाव - तुम्ही जर जास्त वेळ तणावाखाली असाल तर तुमची भुवयांच्या वरची कपाळावरची बाजू दुखायला सुरुवात होऊ शकते.
मायग्रेन किंवा अर्धशिशी - अर्धशिशीमध्ये तुमच्या चेहऱ्याची एक बाजू दुखायला सुरुवात होते... डोळ्यांचा वरचा आणि डोळ्यांचा खालचा भाग दुखू लागतो.
क्लस्टर - क्लस्टरमध्ये बऱ्याचदा तुमचा एकच डोळा दुखू लागतो.
ही चारही प्रकारची डोकेदुखी तुम्हाला ताण-तणावामुळे असू शकते. तसचं मेंदूमध्ये रक्तस्राव होणं, ब्रेन ट्युमर यांसारख्या गंभीर आजारांची ही लक्षणं असू शकतात. त्यामुळे, डोकेदुखीला दुर्लक्ष करू नका...