मुंबई : सध्याच्या फास्टफूडच्या जगात उपवासाला फारसे महत्वाचे स्थान राहिले नाही. शरिराला अन्न जेवढे गरजेचे असते तितकेच किंबहूना त्याहून जास्त गरजेचे उपवास आहेत.
आपल्याकडे उपवासाला धार्मिक महत्व प्राप्त झाले आहे. पण या धार्मिक महत्वाबरोबरच वैज्ञानिक महत्वही तेवढेच झाले आहे.
उपवास हे शरिरासाठी औषधासारखे काम करते. नियमीत उपवास सुदृढ आरोग्याचे लक्षण मानले जाते. उपवास केल्याने शरिर कमजोर न होत उलट अजून शक्ती येते आणि मन प्रसन्न राहण्यास मदत होते.
मन आणि शरिराच्या शुद्धीसाठी उपवासाचा मार्ग अवलंबतात असे हिंदू धर्मात उपवासाचे वर्णन केले आहे. यामुळे उपवासाला मोक्षाचे साधन असे म्हटले जाते.
सध्याच्या फास्टफूडच्या जगात आपण आपल्या जिभेचे चोचले खूप पुरवतो. त्यामुळे शरिराला आवश्यकतेपेक्षा जास्त अन्न आपण देतो.
यामुळेच उपवासाला या युगात अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.
काहीही न खाता केलेला उपवास आणि थोडेसे खाऊन केलेला उपवास असे यात दोन प्रकार आहेत.
यातील काहीही न खाता केलेला कडक उपवास हा नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावा. तर थोडेसे खाऊन आपण सगळेजण नेहमी करतोच.
पण सध्या उपवासाचे एवढे पदार्थ बाजारात मिळतात कि उपवास घडण्यापेक्षा गरजेपेक्षा जास्तच खातो.
सामान्यतः उपवासादिवशी पोटाला पचायला हलका असा आहार करावा. यामुळे मलमुत्राचे विसर्जन योग्य वेळी होते तसेच शरिर हलके होण्यास मदत होते.
अंगाचा जडपणा निघून जाऊन आळस कमी होतो आणि मन शांत तसेच प्रसन्न राहण्यास मदत होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.